चांगेफळ येथील शेतकर्‍याची आत्महत्या

By admin | Published: August 8, 2014 11:38 PM2014-08-08T23:38:27+5:302014-08-09T00:05:34+5:30

सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकर्‍याची आत्महत्या; दुबार पेरणीचे संकट.

Suicides of Farmer in Changfal | चांगेफळ येथील शेतकर्‍याची आत्महत्या

चांगेफळ येथील शेतकर्‍याची आत्महत्या

Next

सिंदखेडराजा : तालुक्यातील चांगेफळ येथील अल्पभुधारक शेतकर्‍याने ७ ऑगस्ट रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली. चांगेफळ येथील शेतकरी बाळासाहेब रावसाहेब मोगल (३0) यांच्यावर वाढलेले कर्ज तसेच दुबार पेरणीचे संकट नव्याने आले. त्यामुळे खचून गेलेल्या बाळासाहेब मोगल या शेतकर्‍याने स्वत:च्या राहत्या घरी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भात शंतनु मोगल व सुधाकर आढाव यांनी किनगावराजा पोलिस स्टेशनला माहिती दिली. यांच्या पश्‍चात पत्नी, २ मुली व आई असा आप्त परिवार आहे.

Web Title: Suicides of Farmer in Changfal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.