ग्रामीण भागात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 07:05 PM2021-05-09T19:05:43+5:302021-05-09T19:05:56+5:30

Akola News : निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी ग्राम प्रशासनातील कर्मचाऱ्यांना दिले.

Strictly enforce restrictions to break the chain of corona infection in rural areas! | ग्रामीण भागात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा!

ग्रामीण भागात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा!

googlenewsNext

अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, तातडीने नियोजन करून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी ग्राम प्रशासनातील कर्मचाऱ्यांना दिले.

जिल्ह्यातील बाळापूर, बार्शिटाकळी व तेल्हारा तालुक्यांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, आशा स्वयंसेविका, अंगणवाडीसेविका, जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक, प्राथमिक आरोग्य केंद्रांतील अधिकारी, कर्मचारी तसेच तालुकास्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बैठकीत ते बोलत होते.

 

ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी प्रत्येक तालुक्यातील पंचायत समिती व ग्रामपंचायतनिहाय कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी गावपातळीवर वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणासाठी गावातील नागरिक घराबाहेर पडणार नाहीत, यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी साैरभ कटियार यांनी ग्राम प्रशासनातील संंबंधित कर्मचाऱ्यांना दिले. तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी चाचण्या वाढवून, कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या चाचण्या करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

Web Title: Strictly enforce restrictions to break the chain of corona infection in rural areas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.