अकोला जिल्ह्यात मतदार नोंदणीची विशेष मोहीम सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:58 PM2019-07-21T12:58:13+5:302019-07-21T12:58:18+5:30

अकोला: मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात मतदार यादीत नावे नोंदविण्यासाठी २०, २१, २७ व २८ जुलै असे चार दिवस विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

A special campaign for voter registration started in Akola district! | अकोला जिल्ह्यात मतदार नोंदणीची विशेष मोहीम सुरू!

अकोला जिल्ह्यात मतदार नोंदणीची विशेष मोहीम सुरू!

Next

अकोला: मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात मतदार यादीत नावे नोंदविण्यासाठी २०, २१, २७ व २८ जुलै असे चार दिवस विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमेच्या पहिल्या दिवशी (शनिवारी) जिल्ह्यात मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी ८३६ नवमतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे (बीएलओ) अर्ज सादर केले.
गत १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ज्या मतदारांची मतदार यादीत नोंदणी झाली नाही, अशा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्याचे निवडणूक आयोगाने घोषित केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात २०, २१, २७ व २८ जुलै रोजी चार दिवस मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शनिवार, २० जुलै रोजी जिल्ह्यातील १ हजार ६८० मतदान केंद्रांवर मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये मतदार यादीत नवीन मतदारांची नावे समाविष्ट करणे, मतदार यादीतील दुबार, स्थलांतरीत व मयत मतदारांची नावे वगळणे, नावांत दुरुस्ती व पत्त्यात दुरुस्ती संदर्भात मतदारांकडून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारले. मोहिमेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाच विधानसभा मतदारसंघात मतदार यादीत नावे नोंदणीसाठी ८३६ नवमतदारांनी अर्ज सादर केले. तसेच मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी ३३४,नावांत दुरुस्तीसाठी ३६९ आणि पत्त्यात दुरुस्तीसाठी १० मतदारांकडून अर्ज मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांकडे सादर करण्यात आले.

विधानसभा मतदारसंघनिहाय नाव नोंदणीसाठी असे प्राप्त झाले अर्ज!
मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात शनिवारी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मतदार यादीत नाव नोंदणीसाठी ८३८ नव मतदारांकडून अर्ज सादर करण्यात आले. त्यामध्ये अकोट विधानसभा मतदारसंघात -१३६, बाळापूर विधानसभा मतदारसंघात- ३४०, अकोला पश्चिम विधानसभा मतदासंघात- ५३, अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात-७८ व मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात २३६ नवमतदारांचे अर्ज प्राप्त झाले.

 

Web Title: A special campaign for voter registration started in Akola district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.