सोयाबीन काढणीचे दर वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 07:20 PM2017-10-23T19:20:41+5:302017-10-23T19:21:24+5:30

अकोला:  विदर्भात यावर्षी पावसाच्या अनिश्‍चितेमुळे  सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट झाली असून, एकरी ३ ते ४  क्विंटल एवढाच उतारा लागला आहे. पण, काढणीचे दर मात्र  गगनाला भिडल्याने शेतकर्‍यांचे कंबरडेच मोडले आहे. 

Soybean harvesting rate increased! | सोयाबीन काढणीचे दर वाढले!

सोयाबीन काढणीचे दर वाढले!

Next
ठळक मुद्देहार्वेस्टरच्याही दरात वाढशेतकर्‍यांचे मोडले कंबरडे

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला:  विदर्भात यावर्षी पावसाच्या अनिश्‍चितेमुळे  सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट झाली असून, एकरी ३ ते ४  क्विंटल एवढाच उतारा लागला आहे. पण, काढणीचे दर मात्र  गगनाला भिडल्याने शेतकर्‍यांचे कंबरडेच मोडले आहे. 
यावर्षी राज्यात ३७ लाखांवर सोयाबीनचा पेरा झाला आहे.  विदर्भात हे क्षेत्र १७ लाख हेक्टरवर आहे. विदर्भात सुरुवातीला  पाऊस लांबल्याने या पिकावर त्याचे प्रतिकूल परिणाम झाले  आहेत. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला. अनेक भागात एकरी  ३ ते ४ क्विंटल उतारा येत असून, काढणीचे दर मात्र वाढले  आहेत. हार्वेस्टरने सोयाबीन काढायचे असल्यास केवळ  सोयाबीन काढणीसाठी एक हजार ते १,२00 रुपये घेतले जात  आहेत. तुरीमधील सोयाबीन काढायचे असेल, तर एकरी  १,७00 ते १,८00 रुपये शेतकर्‍यांना मोजावे लागत आहेत.  मजुराकरवी काढण्याचे दर एकरी १,५00 ते १,६00 रुपये  आहेत.
यावर्षी सोयाबीनचे हमीदर २ हजार ८५0 रुपये आहेत. २00 रु पये बोनस मिळून शेतकर्‍यांना ३ हजार ५0 रुपये प्रतिक्विंटल  मिळणार आहेत. पण, यावर्षी बाजारात सरासरी २,५६0 रुपये  िक्ंवटल दराने सोयाबीनची खरेदी केली जात आहे. जास्तीचे दर  २,९२५ रू पये प्रतिक्विंटल आहेत तथापि प्रतवारीनुसार हे दर शे तकर्‍यांना २,२00 रू पये क्विंटलप्रमाणेच दिले जात आहेत.
हमी दराने सोयाबीन खरेदीची घोषणा संबंधित यंत्रणेने केली  आहे. पण, अद्याप खरेदी सुरू  झाली नसल्याने शेतकर्‍यांना व्या पार्‍यांनाच सोयाबीन विकावे लागत आहे. यावर्षी उतारा  घटल्याने उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे. ही सर्व बाजूने  प्रतिकूल परिस्थिती असताना सोयाबीन काढणीच्या दरात मात्र  वाढ झाली आहे. दरम्यान, मंगळवारी हमी दराने सोयाबीन खरेदी  केली जाणार असल्याचे वृत्त आहे.

अगोदरच उत्पादन खर्च निघणे कठीण असताना सोयाबीन  काढणीच्या दरात वाढ झाली आहे. शासनाने तातडीने हमी दराने  सोयाबीन खरेदी करावी, खरेदी करताना प्रतवारीचे निकष शि िथल कर

Web Title: Soybean harvesting rate increased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती