अकोल्याच्या बाजारात सोयाबीनची आवक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 06:38 PM2019-06-07T18:38:19+5:302019-06-07T18:38:24+5:30

अकोला : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक सुरू असून, दर प्रतिक्ंिवटल ३,५२५ रुपये आहेत. हे दर मागील महिन्यापासून स्थिर आहेत.

Soya bean arriving in Akola market | अकोल्याच्या बाजारात सोयाबीनची आवक सुरूच

अकोल्याच्या बाजारात सोयाबीनची आवक सुरूच

Next

अकोला : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक सुरू असून, दर प्रतिक्ंिवटल ३,५२५ रुपये आहेत. हे दर मागील महिन्यापासून स्थिर आहेत.
यावर्षी सुरुवातीला सोयाबीनची आवक बाजारात चार हजार क्ंिवटलपर्यंत पोहोचली होती. सुरुवातीला सोयाबीनचे दर कमी होते. तथापि, अल्पभूधारक शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्याने त्यांनी सोयाबीनची विक्री केली. त्यानंतर फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन दर ३,७०० रुपयांवर पोहोचले होते. आता हे दर कमी झाले असून, प्रतिक्ंिवटल सरासरी ३,५२५ रुपये आहेत. चांगल्या दर्जेदार पिवळ्या दाण्याच्या सोयाबीनला प्रतिक्ंिवटल ३,५५० रुपये दर आहेत. मागील महिन्यापासून हे दर स्थिर आहेत. शेतकऱ्यांना मात्र आणखी दर वाढण्याची अपेक्षा आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज सरासरी १,३०० क्ंिवटल आवक सुरू आहे. शुक्रवारी १,३४९ क्ंिवटल आवक होती. हरभºयाचे दर मात्र कमी आहेत. हरभºयाची सरासरी आवक दररोज ११०० क्ंिवटल आहे. शुक्रवारी ही आवक १,१२३ क्ंिवटल होती. हरभºयाचे दर आजमितीस सरासरी प्रतिक्ंिवटल ४,३५० रुपये आहेत तर जास्तीत जास्त प्रतिक्ंिवटल ४,४०० रुपये दर आहेत. हरभºयाचे हे दर हमीदरापेक्षा कमी आहेत. पांढºया हरभºयाची आवक केवळ २२ क्ंिवटल असून, प्रतिक्ंिवटल सरासरी ४,५०० रुपये दर आहेत. जास्तीत जास्त आणि कमीत कमी दरही ४,५०० रुपये आहेत. तिळाचे दर मात्र प्रतिक्ंिवटल सरासरी, जास्त १०,४०० आहेत. हे दर सर्व धान्यापेक्षा जास्त आहेत. तिळाची आवक मात्र दोन क्विंटल एवढीच आहे. तुरीचे दरही गत महिन्यापासून स्थिर असून, प्रतिक्ंिवटल सरासरी ५,८०० रुपये आहेत. जास्तीत जास्त ५,९०० तर कमीत कमी दर प्रतिक्ंिवटल ५,४०० रुपये आहेत. तुरीची आवक सरासरी ६०० क्ंिवटल असून, शुक्रवारी ही आवक ६३५ क्ंिवटल होती. मुगाची आवक घटली आहे. सध्या सरासरी १८० क्ंिवटल आवक असून, शुक्रवारी १८४ क्ंिवटल आवक होती. शुक्रवारी मुगाचे दर प्रतिक्ंिवटल सरासरी ५,४५० रुपये होते. जास्तीत जास्त दर ६,२०० रुपये प्रतिक्ंिवटल तर कमीत कमी दर ४,२०० रुपये आहेत. उडीद कडधान्याची आवक घटली आहे. शुक्रवारी उडिदाची आवक केवळ ३० क्ंिवटल होती. प्रतिक्ंिवटल सरासरी दर ४,६५० रुपये आहेत. जास्तीत जास्त ४,९०० तर कमीत कमी दर ४,१०० रुपये प्रतिक्ंिवटल आहेत.

 

Web Title: Soya bean arriving in Akola market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.