फुटबॉलची परंपरा जोपासत आहे सुफियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 01:22 AM2017-10-31T01:22:27+5:302017-10-31T01:22:36+5:30

अकोला : उस्मानाबाद येथे २९ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय  शालेय फुटबॉल स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतून राष्ट्रीय स् पर्धेकरिता महाराष्ट्र संघाची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र  संघात अकोल्याचा सुफियान शेख याची निवड झाली आहे.

Sophiyan is growing in the tradition of football | फुटबॉलची परंपरा जोपासत आहे सुफियान

फुटबॉलची परंपरा जोपासत आहे सुफियान

Next
ठळक मुद्देसलग तिसर्‍या वर्षी सुफियान शेख महाराष्ट्र संघात

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : उस्मानाबाद येथे २९ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय  शालेय फुटबॉल स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतून राष्ट्रीय स् पर्धेकरिता महाराष्ट्र संघाची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र  संघात अकोल्याचा सुफियान शेख याची निवड झाली आहे.  जम्मू-काश्मीर येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेत सुफियान महाराष्ट्राचे  प्रतिनिधित्व करणार आहे. सुफियान सलग तिसर्‍या वर्षी राष्ट्रीय  शालेय स्पर्धेत खेळप्रदर्शन करणार आहे, हे येथे उल्ल्ेाखनीय.
सुफियान अवघ्या १५ वर्षांचा आहे. सुफियान त्याच्या घराण्याचा  फुटबॉल वारसा पुढे नेण्यासोबतच, अकोला जिल्हय़ाची  फुटबॉल क्रीडा परंपरा जोपासत आहे. सुफियानचे आजोबा शेख  चांद हे अकोल्यातील पहिले संतोष ट्रॉफी प्लेअर आहेत. वडील  फईम शेख महाराष्ट्र पोलीस विभागाचे स्टार फुटबॉलपटू आहेत.  अलीकडच्या काळात सुफियान राज्य-राष्ट्रीय स्पर्धेत  अकोल्याचे नाव झळकावित आहे.
उस्मानाबादमध्ये झालेल्या स्पर्धेत सुफियानने १७ वर्षाआतील  वयोगटात क्रीडापीठाचे प्रतिनिधित्व करीत बीईजी पुणे संघासोब त झालेल्या अंतिम सामन्यात निर्णयाक गोल करू न आपल्या  संघाला विजय मिळवून दिला. ३-0 ने क्रीडापीठाने सामना  जिंकला. 
मागील दोन वर्षांपासून सुफीयान क्रीडाप्रबोधिनी बालेवाडी पुणे  येथे शिक्षण घेत आहे. प्रशिक्षक धीरज मिश्रा यांच्या मार्गदर्शनात  सुफियानचा फुटबॉल प्रवास यशस्वी सुरू  आहे. अकोल्यात सेंट  अँन्स स्कूलमध्ये सुफियान शिकत होता. क्रीडा शिक्षक राजेश  ठाकरे  व क्रीडा संघटक सय्यद जावेद अली यांचे वेळोवेळी  सुफियानला मार्गदर्शन लाभत असते.  

असा आहे महाराष्ट्राचा संघ
१७ वर्षाआतील महाराष्ट्र संघात अब्दुल्लाह रंगरेज लातूर, मयूरेश  चौगुले, ओमप्रकाश चौगुले, ओंकार लयकर, प्रवीण घाटगे,  सूर्यप्रकाश ससाणे कोल्हापूर, महंमद दानेश औरंगाबाद, तुषार  देसाई, महमंद शेख, शिवराज पाटील, सुफियान शेख, शांतनू  निंगुळकर क्रीडाप्रबोधिनी पुणे, भूषण जेरपोटे, फरखान रजा नाग पूर, प्रथमेश शिंदे नाशिक, अमितसिंग रबाना मुंबई, शौनक  गायकवाड, सादिर सुब्वाह पुणे यांचा समावेश आहे. रा खीवमध्ये यश मरडेकर, रहिम खेसे, रॉड्रीक, विश्‍वनाथ शेळके,  विनायक वरनागे, कुणाल चव्हाण, बलराज कच्बुले यांचा  समावेश आहे.

Web Title: Sophiyan is growing in the tradition of football

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा