‘गुटखा बंदी’साठी सामाजिक कार्यकर्ते करणार आत्मदहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 02:12 PM2018-06-10T14:12:05+5:302018-06-10T14:12:05+5:30

अकोला : राज्यभरात ग्राहक चळवळ सशक्त करणाऱ्या नॅशनल कंझ्युमर प्रोटेक्शन आॅर्गनायझेशनच्यावतीने पदाधिकारी गुटखा बंदीच्या संदर्भात सोमवार, ११ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष संजय पाठक यांनी सांगितले.

Social activists will do social work for 'Gutkha Ban' | ‘गुटखा बंदी’साठी सामाजिक कार्यकर्ते करणार आत्मदहन

‘गुटखा बंदी’साठी सामाजिक कार्यकर्ते करणार आत्मदहन

googlenewsNext
ठळक मुद्देअवैध गुटखा विक्री व त्याची साठवण करणाºयावर कठोर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. यासाठी आॅर्गनायझेशनने १३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. ११ जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे पाठक यांनी सांगितले.

अकोला : राज्यभरात ग्राहक चळवळ सशक्त करणाऱ्या नॅशनल कंझ्युमर प्रोटेक्शन आॅर्गनायझेशनच्यावतीने पदाधिकारी गुटखा बंदीच्या संदर्भात सोमवार, ११ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष संजय पाठक यांनी सांगितले.
शासकीय विश्रामगृह येथे गुरुवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पाठक यांनी माहिती दिली. अकोला जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीला जोर आला आहे. जिल्हा व पोलीस प्रशासन यंत्रणा याकरिता कुचकामी ठरली आहे. युवापिढी यामुळे व्यसनाधीन होऊन त्यांचे आरोग्य बिघडत आहे. राज्यात सर्वत्र गुटखा बंदी असतानाही अकोला शहरात सर्रास गुटखा व अन्य तत्सम अमली पदार्थ उघडपणे विक्री होत आहे. अवैध गुटखा विक्री व त्याची साठवण करणाºयावर कठोर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. यासाठी आॅर्गनायझेशनने १३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या पुढाकाराने आमरण उपोषण पाच दिवसात सोडविण्यात आले होते. या उपोषणास राज्यभरातही सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधींनी पाठिंबा देत उपक्रमाचे स्वागत केले होते. पालकमंत्री यांनी यासंदर्भात कार्यवाही करण्याची ग्वाही दिली होती; मात्र दोन महिने उलटल्यावरही अद्याप गुटखा विक्री करणाºयांवर कारवाई झाली नाही. म्हणून ११ जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे पाठक यांनी सांगितले.
आॅर्गनायझेशनच्या या सामाजिक उपक्रमास नागरिक व संस्थांनी सहकार्य करावे, असे पाठक म्हणाले. याप्रसंगी आॅर्गनायझेशनचे विदर्भ अध्यक्ष गजानन वारकरी, विदर्भ महिला अध्यक्ष टीना देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Social activists will do social work for 'Gutkha Ban'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला