सिकलसेलचा ‘एनएसएस’मध्ये समावेश

By admin | Published: July 13, 2015 01:12 AM2015-07-13T01:12:51+5:302015-07-13T01:12:51+5:30

जनजागृतीसाठी ११ विद्यापीठांना निर्देश

Sicklecel's 'NSS' includes | सिकलसेलचा ‘एनएसएस’मध्ये समावेश

सिकलसेलचा ‘एनएसएस’मध्ये समावेश

Next

अकोला: सिकलसेल या दुर्धर आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) माध्यमातून जनजागृती करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाने घेतला. याकरिता ह्यएनआरएचएमह्ण व सिकलसेल सोसायटी ऑफ इंडिया यांच्या मदतीने जनजागृती करण्याचे निर्देश राज्यातील ११ विद्यापीठांना देण्यात आले आहेत. नागपूर विभागातील अकरा जिल्ह्यांसह मराठवाड्यातील नंदूरबार ते पश्‍चिम विदर्भात सिकलसेल या क्लिष्ट आजाराची पाळेमुळे पसरत चालली आहेत. सिकलसेलच्या रुग्णांची सर्वाधिक संख्या पूर्व विदर्भात असताना उपचाराचे केंद्र नागपूरऐवजी मुंबईमध्ये कार्यान्वित आहे. या आजारावरील उपचार खर्चिक असून, विदर्भातील रुग्णांना उपचारासाठी मुंबईत जावे लागते. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानमार्फत (एनआरएचएम) सिकलसेल रुग्णांसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त होत असला, तरी त्याचा लाभ रुग्णांना मिळत नसल्याचे चित्र आहे. सिकलसेलचा प्रसार महाविद्यालयातील युवा-युवतींकडून लग्न केल्यानंतर नकळतपणे होत असल्याने यावर उपाय म्हणून या आजाराबद्दल जनजागृती करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमात (एनएसएस) सिकलसेल जागृतीचा समावेश करण्यात आला असून, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या माध्यमातून खेड्यापाड्यापर्यंंंत सिकलसेल प्रतिबंधाची माहिती देणे शक्य होणार आहे. तसे निर्देश राज्यातील ११ विद्यापीठांना देण्यात आले आहेत. *अहवाल सादर करावा लागेल संबंधित विद्यापीठांनी सिकलसेलच्या जनजागृतीसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य विभाग व सिकलसेल सोसायटी ऑफ इंडिया यांची मदत घेऊन तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने, प्रदर्शनीचे आयोजन व माहितीपत्रकाच्या स्वरूपात कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश आहेत. वर्षभरातील कार्यक्रमाचा आढावा, छायाचित्र, वर्तमानपत्रातील कात्रण आदी अहवाल उच्च व तंत्रशिक्षण विभागाला सादर करावा लागेल.

Web Title: Sicklecel's 'NSS' includes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.