अकोला रेल्वे स्टेशनच्या टीएनसी कार्यालयात शॉर्ट सर्किट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 01:33 AM2018-01-04T01:33:30+5:302018-01-04T01:33:46+5:30

अकोला : स्थानिक रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफार्म क्रमांक एकवरील टीएनसी कार्यालयात बुधवारी सायंकाळी शॉर्ट सर्किटची घटना घडली. मात्र, येथील महिला कर्मचारीच्या समयसूचकतेमुळे होणारी मोठी दुर्घटना टळली.

Short circuit in the TNC office of Akola Railway Station | अकोला रेल्वे स्टेशनच्या टीएनसी कार्यालयात शॉर्ट सर्किट

अकोला रेल्वे स्टेशनच्या टीएनसी कार्यालयात शॉर्ट सर्किट

Next
ठळक मुद्देमहिला कर्मचार्‍याच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : स्थानिक रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफार्म क्रमांक एकवरील टीएनसी कार्यालयात बुधवारी सायंकाळी शॉर्ट सर्किटची घटना घडली. मात्र, येथील महिला कर्मचारीच्या समयसूचकतेमुळे होणारी मोठी दुर्घटना टळली. बुधवारी सायंकाळी ५.४५ वाजता टीएनसी कार्यालयात अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. आग पाहताच, येथे उपस्थित असलेल्या एस.एस. ऑफीसची महिला कर्मचारी यासमीन नाज हिने तातडीने धाव घेत, स्टेशन अधीक्षक कार्यालयातील अग्नी विरोधक उपकरण काढून आग विझविली. 
त्यामुळे होणारी दुर्घटना टळली. यामध्ये एल.आय. गावंडे यांनीदेखील सहकार्य केले. या घटनेमुळे रेल्वे स्थानकावरील वीज पुरवठा काही वेळासाठी खंडित करण्यात आला होता. त्यामुळे स्थानकावरील उद्घोषणाप्रणाली देखील काही वेळासाठी बंद झाली होती.

Web Title: Short circuit in the TNC office of Akola Railway Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.