पाण्यासाठी शिवसेना आक्रमक; उगवा फाट्यावर ‘रास्ता रोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 04:00 PM2019-01-22T16:00:00+5:302019-01-22T16:00:52+5:30

अकोला: जिल्हा परिषदेतील सत्ताधारी व प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. ही समस्या निकाली काढण्याची मागणी करीत शिवसेनेने ६४ गावांतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत २२ जानेवारी रोजी अकोट-अकोला मार्गावरील उगवा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले.

Shivsena aggressor for water; 'Stop the road' at the Ugwa fata | पाण्यासाठी शिवसेना आक्रमक; उगवा फाट्यावर ‘रास्ता रोको’

पाण्यासाठी शिवसेना आक्रमक; उगवा फाट्यावर ‘रास्ता रोको’

googlenewsNext

अकोला: खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना महिन्यातून एकदा पाणी पुरवठा केला जातो. महान धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असताना जिल्हा परिषदेतील सत्ताधारी व प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. ही समस्या निकाली काढण्याची मागणी करीत शिवसेनेने ६४ गावांतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत २२ जानेवारी रोजी अकोट-अकोला मार्गावरील उगवा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. रास्ता-रोको आंदोलनामुळे वाहतुक खोळंबली असून, दोन्ही बाजूंनी दोन ते तीन किलोमिटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
महान धरणातून खारपाणपट्ट्यातील ६४ गावांना खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा केला जातो. महान धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असून, ६४ गावांना दररोज पाणी पुरवठा करणे शक्य आहे. तरीसुद्धा संबंधित गावांना तब्बल १८ ते २० दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भारिप-बहुजन महासंघ व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांना नियमित पाणी पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. महिन्यातून एकदा संबंधित गावांना पाणी पुरवठा होत असल्याने महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सत्ताधारी भारिपने व जि.प. प्रशासनाने ६४ गावांना एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू न केल्यास शिवसेनेच्यावतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मागणी मान्य न झाल्यामुळे सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्या नेतृत्वात सोमवारी उगवा फाट्यावर ‘रास्ता रोको’आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, जि.प. सदस्य महादेव गवळे, ज्येष्ठ नेते श्रीरंगदादा पिंजरकर, बंडू ढोरे, मुकेश मुरुमकार, विलास अनासणे, अतुल पवनीकर, ज्योत्सना चोरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तोपर्यंत शिवसैनिक उठणार नाहीत!
उगवा गावात पाणी पुरवठ्याची कोणतीही सुविधा नाही. धरणातील उपलब्ध जलसाठा पाहता ६४ गावांना दररोज पाणी पुरवठा करणे शक्य आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाने मंगळवारी तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलनादरम्यान उगवा फाट्यावरून एकही शिवसैनिक जागेवरून उठणार नसल्याचा सज्जड इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी दिला आहे.

 

Web Title: Shivsena aggressor for water; 'Stop the road' at the Ugwa fata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.