अभियंता मारहाण प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुखास जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 10:40 PM2017-12-08T22:40:19+5:302017-12-08T22:46:30+5:30

कंत्राटदाराचे देयक काढण्यासाठी पैसे मागण्याचा आरोप असलेले जि. प. बांधकाम विभागातील अभियंता किशोर राऊत यांना मारहाण करून, शासकीय  कामात अडथळा आणल्यामुळे शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांच्यावर  कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात देशमुख यांना  न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला.

Shiv Sena district chief secured bail in engineer case | अभियंता मारहाण प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुखास जामीन

अभियंता मारहाण प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुखास जामीन

Next
ठळक मुद्देकंत्राटदाराचे देयक काढण्यासाठी पैसे मागणार्‍या अभियंत्यास केली होती मारहाणशासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी दाखाल केला होता गुन्हा 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कंत्राटदाराचे देयक काढण्यासाठी पैसे मागण्याचा आरोप असलेले जि. प. बांधकाम विभागातील अभियंता किशोर राऊत यांना मारहाण करून, शासकीय  कामात अडथळा आणल्यामुळे शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांच्यावर  कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात देशमुख यांना  न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला.
 पातूर तालुक्यातील अक्षय कुळकर्णी या कंत्राटदाराला देयक काढण्यासाठी शाखा  अभियंता किशोर राऊत हे पैसे मागत असल्याचा आरोप करण्यात आला. याची  माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य नितीन देशमुख यांना  मिळाली. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी देशमुख यांनी, अभियंत्याच्या कार्यालयात जा त, त्याला जाब विचारला. अभियंता किशोर राऊत यांनी आधी पैसे द्या नंतरच  देयक काढतो,असे म्हटल्याचा आरोप करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्यासमोर  अभियंता लाच मागत असल्याचे पाहून संतप्त झालेल्या नितीन देशमुख यांच्यासह  शिवसैनिकांनी अभियंत्याला मारहाण केली. अभियंता राऊत यांच्या तक्रारीनुसार  कोतवाली पोलिसांनी नितीन देशमुख यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा  आणला म्हणून गुन्हा दाखल केला. देशमुख यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी  अभियंता किशोर राऊत याच्यावर गुन्हा दाखल केला. सेनेचे जिल्हा प्रमुख नितीन  देशमुख यांनी, जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने अर्जावर  सुनावणी घेवून त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. (प्रतिनिधी) 

Web Title: Shiv Sena district chief secured bail in engineer case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.