जिल्हा मार्केटिंग कार्यालयावर शिवसेनेचा हल्लाबोल ; खुर्चीवर तूर-हरभरा टाकून केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 05:22 PM2018-05-18T17:22:20+5:302018-05-18T17:25:38+5:30

जिल्ह्यातील ३२ हजार शेतकऱ्यांची तूर व हरभऱ्याची खरेदी प्रक्रिया ठप्प पडला असून याप्रकाराला जिल्हा मार्केटिंग अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करीत शुक्रवारी जिल्हा शिवसेनेच्यावतीने मार्केटिंग कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

Shiv Sena attack on District Marketing Office | जिल्हा मार्केटिंग कार्यालयावर शिवसेनेचा हल्लाबोल ; खुर्चीवर तूर-हरभरा टाकून केला निषेध

जिल्हा मार्केटिंग कार्यालयावर शिवसेनेचा हल्लाबोल ; खुर्चीवर तूर-हरभरा टाकून केला निषेध

Next
ठळक मुद्देशिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात असंख्य शिवसैनिकांनी जिल्हा मार्केटिंग कार्यालयावर धडक दिली. शिवसेनेच्या आंदोलनाची कुणकुन लागलेल्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी राजेश तराळे यांच्यासह इतर अधिकाºयांनी कार्यालयातून गायब होणे पसंत केले.अधिकारी हजर नसल्याचा संताप व्यक्त करीत शिवसैनिकांनी अधिकाºयांच्या खूर्चीवर तूर-हरभरा ओतून निषेध व्यक्त केला.

अकोला: अकोला जिल्ह्यातील केवळ १४ हजार शेतकऱ्यांची तूर व हरभरा खरेदी करून ‘नाफेड’ने मुदत संपल्याची सबब पुढे करीत गाशा गुंडाळला. वखार महामंडळाच्या गोदामात बाहेरील जिल्ह्यातील तूर व हरभऱ्याची साठवणूक केल्यामुळे जिल्ह्यातील ३२ हजार शेतकऱ्यांची तूर व हरभऱ्याची खरेदी प्रक्रिया ठप्प पडला असून याप्रकाराला जिल्हा मार्केटिंग अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करीत शुक्रवारी जिल्हा शिवसेनेच्यावतीने मार्केटिंग कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची कुणकून लागलेले अधिकारी गायब झाल्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी कार्यालयात व अधिकाºयांच्या खुर्चीवर तूर-हरभरा टाकून निषेध व्यक्त केला.
शेतकºयांनी उत्पादित केलेल्या शेतमालाची खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने संबंधित शेतमालाची आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु केली. आॅनलाईन प्रक्रियेदरम्यान तूर-हरभरा विक्रीसाठी जिल्हाभरातील ४६ हजार शेतकºयांनी नोंदणी केली. शेतमालाची नोंदणी करून त्याची जलदगतीने खरेदी करणे अपेक्षित असताना ‘नाफेड’च्या यंत्रणेने जाणीवपूर्वक संथगतीने प्रक्रिया राबवली. यादरम्यान, आॅनलाईन नोंदणी झालेल्या १४ हजार शेतकºयांची केवळ २ लाख ६ हजार क्विंटल तूरीची खरेदी होऊ शकली. अर्थातच आजरोजी उर्वरित ३२ हजार शेतकऱ्यांची किमान ५ लाख क्विंटल तूर खरेदी होणे बाकी असताना ‘नाफेड’ने गाशा गुंडाळला. हा प्रकार कमी म्हणून की काय, वखार महामंडळाच्या गोदामांत बाहेरील जिल्ह्यातील तूर-हरभऱ्याची साठवणूक केल्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांची तूर तशीच उघड्यावर पडून असल्याचा आरोप करीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात असंख्य शिवसैनिकांनी जिल्हा मार्केटिंग कार्यालयावर धडक दिली. शिवसेनेच्या आंदोलनाची कुणकुन लागलेल्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी राजेश तराळे यांच्यासह इतर अधिकाºयांनी कार्यालयातून गायब होणे पसंत केले. तूर-हरभरा खरेदीच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी अधिकारी हजर नसल्याचा संताप व्यक्त करीत शिवसैनिकांनी अधिकाºयांच्या खूर्चीवर तूर-हरभरा ओतून निषेध व्यक्त केला.

 

Web Title: Shiv Sena attack on District Marketing Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.