‘शहारुख खान’ने फोडले बार्शिटाकळीचे एटीएम; पोलीस कोठडीत रवानगी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 09:03 PM2018-01-01T21:03:56+5:302018-01-01T21:06:18+5:30

बार्शीटाकळी : येथील स्टेट बँकेचे ए.टी.एम. १३ डिसेंबर२0१७ च्या रात्री फोडून अज्ञात  आरोपींनी आठ लाख ४८ हजार ३00 रुपयांची रक्कम लंपास केली होती. या चोरीच्या  घटनेतील एक आरोपी शहारूखखान सुभानखान (वय १९) हा वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील पंचशीलनगरातील रहिवासी असून, त्याला बार्शीटाकळी पोलिसांनी १ जानेवारी रोजी मंगरुळपीरातूनच अटक केली.

Shaharuk Khan blamed Barstyclin's ATM; Police deported! | ‘शहारुख खान’ने फोडले बार्शिटाकळीचे एटीएम; पोलीस कोठडीत रवानगी!

‘शहारुख खान’ने फोडले बार्शिटाकळीचे एटीएम; पोलीस कोठडीत रवानगी!

Next
ठळक मुद्देया घटनेत आणखी सहा-सात आरोपी असल्याची पोलिसांकडे माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शीटाकळी : येथील स्टेट बँकेचे ए.टी.एम. १३ डिसेंबर२0१७ च्या रात्री फोडून अज्ञात  आरोपींनी आठ लाख ४८ हजार ३00 रुपयांची रक्कम लंपास केली होती. या चोरीच्या  घटनेतील एक आरोपी शहारूख खान सुभान खान (वय १९) हा वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील पंचशीलनगरातील रहिवासी असून, त्याला बार्शीटाकळी पोलिसांनी १ जानेवारी रोजी मंगरुळपीरातूनच अटक केली.
पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ‘शाहरुख’ला ३ जानेवारीपर्यंत  पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. या चोरीच्या घटनेत आणखी सहा ते सात  आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून उर्वरित, सर्व आरोपी हरियाणा  राज्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. 

Web Title: Shaharuk Khan blamed Barstyclin's ATM; Police deported!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.