संदीप मांजरे आत्महत्या प्रकरणातील आरोपी दोषमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:17 PM2018-09-01T12:17:50+5:302018-09-01T12:20:12+5:30

अकोला - एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवणी येथील रहिवासी संदीप तोताराम मांजरे बहुचर्चित अत्महत्या प्रकरणातील आरोपींची न्यायालयाने गुरुवारी निर्दोष मुक्तता केली.

Sandeep Manjare suicide case, accused aquital | संदीप मांजरे आत्महत्या प्रकरणातील आरोपी दोषमुक्त

संदीप मांजरे आत्महत्या प्रकरणातील आरोपी दोषमुक्त

Next
ठळक मुद्देशिवणी येथील रहिवासी संदीप मांजरे यांचा मृतदेह शिवापूर रस्त्यावर १३ सप्टेंबर २०१५ रोजी आढळून आला होताया प्रकरणात मीना योगेश भालतीलक व योगेश भालतिलक यांच्या विरुद्ध ३०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. आरोप सिद्ध करण्यात सरकारपक्षास अपयश आल्यामुळे आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.


अकोला - एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवणी येथील रहिवासी संदीप तोताराम मांजरे बहुचर्चित अत्महत्या प्रकरणातील आरोपींची न्यायालयाने गुरुवारी निर्दोष मुक्तता केली.
शिवणी येथील रहिवासी संदीप मांजरे यांचा मृतदेह शिवापूर रस्त्यावर १३ सप्टेंबर २०१५ रोजी आढळून आला होता. या प्रकरणी बाशीर्टाकळी पोलिसांनी तपास करून या प्रकरणात मीना योगेश भालतीलक व योगेश भालतिलक यांच्या विरुद्ध ३०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. या दोघांच्या जाचाला कंटाळून संदीप ने अत्महत्या केली असा त्यांच्यावर आरोप होता. परंतु संजय ची हत्या की आत्महत्या हा प्रश्न आरोपीचे वकील प्रवीण कडाळे यांनी उपस्थित केला. आरोपींना या गुन्ह्यात गोवले असा आरोपीच्या वकिलाचा बचाव होता. या खटल्यात न्यायालयाने १४ साक्षीदार तपासण्यात आले. यातील आरोपी महिला मीना हिने मृतकाच्या खात्यातून घटनेच्या तीन दिवस आधी ३० हजार रुपये काढल्याचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा न्यायालयासमोर दाखल करण्यात आले होते. परंतु आरोपीविरुद्ध आरोप सिद्ध करण्यात सरकारपक्षास अपयश आल्यामुळे आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणी आरोपींच्यावतीने अ‍ॅड. प्रविण कढाळे यांनी कामकाज पाहीले.

Web Title: Sandeep Manjare suicide case, accused aquital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.