लावणीच्या तालावर सख्यांनी धरला फेर

By admin | Published: December 31, 2014 12:49 AM2014-12-31T00:49:59+5:302014-12-31T00:49:59+5:30

लोकमत सखी मंचचे आयोजन : अर्चना सावंत यांच्या लावणी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

Sakhars reclaim on the tank of Lavani | लावणीच्या तालावर सख्यांनी धरला फेर

लावणीच्या तालावर सख्यांनी धरला फेर

Next

अकोला : लावणीचा ठसका, बहारदार नृत्य, मनाला भुरळ घालणारी अदाकारी आणि व्यासपीठावर चैतन्य निर्माण करणार्‍या घुंगरांच्या आवाजाने मनोरंजनाची सीमाच गाठली. महाराष्ट्राची लाडकी लावणीसम्राज्ञी तथा सिनेकलाकार अर्चना सावंत यांनी लोकमत सखी मंचच्या रंगमंचावर आपल्या अदाकारीने शेकडो सखींना मंत्रमुग्ध केले. शिट्या, टाळ्यांच्या उत्साहात या अप्सरेच्या ठेक्यावर सखीही थिरकल्या.
लोकमत सखी मंच प्रस्तुत ह्यअप्सरा आलीह्ण हा लावणीचा कार्यक्रम ३0 डिसेंबर रोजी येथील प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. रंगमहालातील लावणीला घराघरांत प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेल्या अर्चना सावंत यांच्या अस्सल लावणीचा बाज पाहण्यासाठी सखींनी दुपारपासूनच कार्यक्रमस्थळी गर्दी केली होती. अर्चना सावंत यांच्या मंचावरील आगमनासाठी आतुर झालेल्या सखींनी एकच जल्लोष करीत त्यांचे स्वागत केले.
आरंभी सखी मंच विभागप्रमुखांच्या हस्ते ङ्म्रद्धेय बाबूजींच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. ज्येष्ठ विभागप्रमुख रजनी राजगुरू यांचे स्वागत इव्हेंट हेड प्रशांत पाटील यांनी केले. यावेळी राजगुरु यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर अप्सर एकापाठोपाठ मंचावर अवतरल्या आणि त्यांनी एकापेक्षा एक सरस लावण्यांचे सादरीकरण केले.
'या रावजी, बसा भावजी' ही बैठकीतील लावणी सादर करून आपल्या मुद्राभिनयाने सावंत यांनी सख्यांचे मन जिंकले. श्रुंगारिक लावणीतील साधेपणा दाखवित 'बाई मी लाडाची गं लाडाची.', 'आता वाजले की बारा.', 'कुण्या गावाचं आलं पाखरु.', 'कारभारी दमानं' अशा एकापेक्षा एक सरस गीतांवर मराठमोळी नखरेल अदाकारी सादर करुन अर्चनाने सभागृहातील तरुणींपासून ते वृद्ध सख्यांनाही थिरकण्यास भाग पाडले.

Web Title: Sakhars reclaim on the tank of Lavani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.