आर्थिक घोळाच्या चौकशीसाठी रिपब्लिकन सेनेचा पारस ग्रामपंचायतीवर निघणार आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 10:41 PM2017-12-14T22:41:52+5:302017-12-14T22:45:35+5:30

अनेकवेळा पाठपुरावा करूनही आर्थिक घोळाची चौकशी संबंधित प्रशासन करीत  नसल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेना व पारस गाव बचाव समितीच्यावतीने ५  जानेवारी रोजी ग्रामस्थांचा पारस ग्रामपंचायतीवर भव्य मोर्चा आयोजित करण्यात  आल्याची माहिती रिप. सेनेचे जिल्हाध्यक्ष देवेश पातोडे यांनी दिली.

A ruckus on the Parsa Gram Panchayat of the Republican Senate to inquire into financial crisis | आर्थिक घोळाच्या चौकशीसाठी रिपब्लिकन सेनेचा पारस ग्रामपंचायतीवर निघणार आक्रोश मोर्चा

आर्थिक घोळाच्या चौकशीसाठी रिपब्लिकन सेनेचा पारस ग्रामपंचायतीवर निघणार आक्रोश मोर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामपंचायत पारसच्या विकास निधीमध्ये आर्थिक घोळ; विकास कामे थांबलीपाठपुराव्यानंतरही चौकशी नाही; ५ जानेवारीला मोर्चा मोर्चाचे आयोजन

लोकमत न्यूज नेवटर्क
अकोला : ग्रामपंचायत पारसच्या विकास निधीमध्ये आर्थिक घोळ झाला असून,  यामुळे ग्रामपंचायत अंतर्गतमधील विकास कामे थांबली आहेत. या संदर्भात  अनेकवेळा पाठपुरावा करूनही आर्थिक घोळाची चौकशी संबंधित प्रशासन करीत  नसल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेना व पारस गाव बचाव समितीच्यावतीने ५  जानेवारी रोजी ग्रामस्थांचा पारस ग्रामपंचायतीवर भव्य मोर्चा आयोजित करण्यात  आल्याची माहिती रिप. सेनेचे जिल्हाध्यक्ष देवेश पातोडे यांनी दिली. स्थानीय  शासकीय विश्रामगृहात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदमध्ये पातोडे यांनी या त थाकथित आर्थिक घोळाची माहिती दिली.
गत दोन वर्षात ४ कोटी ५0 लाख रुपयांची विविध विकास कामे गावात करण्यात  आलीत. यामध्ये तत्कालीन ग्रामपंचायत सचिव यांनी आर्थिक घोळ करून  गावकर्‍यांची दिशाभूल केली असल्याचा आरोप पातोडे यांनी केला. याकडे लोकप्र ितनिधींनीही डोळेझाक केली आहे. विकास निधीसाठी बनावट आवक-जावक  रजिस्टर बनवून यायोगे या निधीची अवैद्य विल्हेवाट लावण्यात आली असून,  दोषींविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी पातोडे यांनी यावेळी केली. पारस  गावाच्या विकासासाठी आयोजित या भव्य आक्रोश मोर्चात गावकर्‍यांनी  सहभागी  होण्याचे आवाहन केले. या पत्रकार परिषदेत रिप.सेनेचे विदर्भ अध्यक्ष योगेंद्र चवरे,  महानगराध्यक्ष जॉन गायकवाड, विनोद घ्यारे, मो. सादिक, भीमराव सोनोने, गजानन  सावळे उपस्थित होते.

Web Title: A ruckus on the Parsa Gram Panchayat of the Republican Senate to inquire into financial crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.