रस्ता सुरक्षा सप्ताहानिमीत्त वॉकेथॉन; वाहतुक शाखा व उपप्रादेशीक परिवहन विभागाचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 01:38 PM2018-11-18T13:38:05+5:302018-11-18T13:40:06+5:30

अकोला - वाहतुक नियंत्रण शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्ताने रविवारी सकाळी प्रबोधन व जनजागृती करीत वॉकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

 Road Safety Weekly Walkthon; Transport Branch and Deputy Indigenous Transportation Department | रस्ता सुरक्षा सप्ताहानिमीत्त वॉकेथॉन; वाहतुक शाखा व उपप्रादेशीक परिवहन विभागाचा सहभाग

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमीत्त वॉकेथॉन; वाहतुक शाखा व उपप्रादेशीक परिवहन विभागाचा सहभाग

googlenewsNext

अकोला - वाहतुक नियंत्रण शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्ताने रविवारी सकाळी प्रबोधन व जनजागृती करीत वॉकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दोन्ही विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेउन रॅलीव्दारे जनजागृती केली.
वाहतुक नियंत्रण शाखेचे प्रमूख तथा सिटी कोतवालीचे ठाणेदार विलास पाटील यांच्या पुढाकारातून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जिचकार यांच्यासह वरोकार व अधिकाºयांनी सहभाग घेउन प्रबोधन व जनजागृती करीत वाकेथॉन रॅली काढण्यात आली. रेल्वे स्टेशन चौक ते अशोक वाटीका चौकापर्यंत ही रॅली काढण्यात आली. या रॅलीव्दारे वाहने वेगाने चालवू नये, हेल्मेट सीटबेल्ट चा वापर करावा, अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी असे फलक लावण्यात आले तर सुचनापत्रक वाटप करण्यात आले. या वॉकेथॉन रॅलीव्दारे वाहनचालक व नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

Web Title:  Road Safety Weekly Walkthon; Transport Branch and Deputy Indigenous Transportation Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.