अर्धा एकरात मिरचीचे विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 03:04 PM2018-09-29T15:04:31+5:302018-09-29T15:34:50+5:30

वाशिम: आधुनिक तंत्रज्ञान आणि कल्पकतेचा वापर करून अवघ्या अर्धा एकर  क्षेत्रात मिरचीचे विक्रमी उत्पादन घेण्याची किमया मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील शेतकरी प्रितम गोविंदराव भगत या युवा शेतकºयाने केली आहे.

Record of chillies in half an acre | अर्धा एकरात मिरचीचे विक्रमी उत्पादन

अर्धा एकरात मिरचीचे विक्रमी उत्पादन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: आधुनिक तंत्रज्ञान आणि कल्पकतेचा वापर करून अवघ्या अर्धा एकर  क्षेत्रात मिरचीचे विक्रमी उत्पादन घेण्याची किमया मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील शेतकरी प्रितम गोविंदराव भगत या युवा शेतकºयाने केली आहे.
प्रितम भगत यांच्याकडे वडिलांच्या नावे असलेली सहा एकर शेती आहे. या शेतीत विविध प्रयोग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ते भाजीपाला पिकांसह, तूर, सोयाबीन, मुग आदि पिके घेतात. त्यांनी याच शेतातील एक एकर क्षेत्रात मल्चिंग पद्धतीने मिरची आणि वांग्याची लागवड केली आहे. यामध्ये अर्धा एकर क्षेत्रात मिरची त्यांनी लावली आहे. मल्चिंग पद्धतीमुळे पाणी कमी लागते, तसेच तणाची समस्याही त्रासदायक ठरत नाही. त्यातच फवारणी आणि खतांचा प्रभावी वापर करून त्यांनी ही मिरची फुलविली. या मिरचीचे उत्पादन सुरू झाले असून, आठवड्याला दोन क्विंटल उत्पादन त्यांना होत आहे. सध्या मिरचीला बºयापैकी दर मिळत असल्याने त्यांचा मिरची लागवडीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे.

Web Title: Record of chillies in half an acre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.