पोलिसांच्या रात्रगस्तीला आता ‘शीघ्र प्रतिसाद दल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 02:21 PM2018-11-17T14:21:52+5:302018-11-17T14:22:28+5:30

अकोला : शहरासह जिल्ह्यातील चोºया, लुटमार व दरोड्यासारख्या घटना रोखण्यासाठी पोलिसांच्या रात्रगस्तीला आता पोलीस अधीक्षकांसोबत असलेला ‘शीघ्र प्रतिसाद दल’ही (क्युआरटी) कार्यरत राहणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

'Quick Response Team' for support to Police at Night petroling | पोलिसांच्या रात्रगस्तीला आता ‘शीघ्र प्रतिसाद दल’

पोलिसांच्या रात्रगस्तीला आता ‘शीघ्र प्रतिसाद दल’

Next

- सचिन राऊत
अकोला : शहरासह जिल्ह्यातील चोºया, लुटमार व दरोड्यासारख्या घटना रोखण्यासाठी पोलिसांच्या रात्रगस्तीला आता पोलीस अधीक्षकांसोबत असलेला ‘शीघ्र प्रतिसाद दल’ही (क्युआरटी) कार्यरत राहणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. गत आठ दिवसांपासून खदान, सिव्हिल लाइन, सिटी कोतवाली व रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शीघ्र प्रतिसाद दलाचे जवान कार्यरत असल्याचे दिसून येत आहे.
शहरात पोलिसांची रात्रगस्त सुरू असते. यादरम्यान एका ठाणेदाराला रोजच रात्रगस्त करावी लागत आहे. अकोला पोलीस प्रशासनातील रिक्त पदांची संख्या आणि अपुºया मनुष्यबळामुळे प्रत्येक पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि शहरातील एका ठाणेदाराच्या मार्गदर्शनात रोजच रात्रगस्त करण्यात येते; मात्र या रात्रगस्तीला पोलीस कर्मचाºयांची संख्या कमी असल्याने त्याच-त्या पोलीस कर्मचाºयांवर ताण येत होता. त्यामुळे पोलीस अधिकाºयांसोबतच आता शीघ्र प्रतिसाद दलाच्या पोलीस कर्मचाºयांनाही पोलिसांसोबतच रात्रगस्तीला लावण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाºयांवरील ताण काही प्रमाणात कमी झाला असून, शीघ्र प्रतिसाद दलामुळे चोºया, लुटमार व दरोड्यासारख्या घटनांना लगाम लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शीघ्र प्रतिसाद दलाचे पोलीस कर्मचारी पोलीस अधीक्षकांसोबतच असतात; मात्र रात्रीला असलेले शीघ्र प्रतिसाद दलाचे कर्मचारी पोलीस मुख्यालयात ड्युटी करीत असल्याने त्यांना शहरातील रात्रगस्त देण्यात आली आहे. त्यामुळे शीघ्र प्रतिसाद दल गत आठ दिवसांपासून शहरातील रात्रगस्त करीत असल्याचे दिसून येत असून, त्यामुळे गुन्हे रोखण्यास मदत होत असल्याचे वास्तव आहे.
---------------------------
गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न
शीघ्र प्रतिसाद दलातील पोलीस कर्मचाºयांची रात्रगस्त सुरू करण्यात आली असून, रात्रीचे घडणारे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती आहे. पोलीस अधिकारी व पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांच्यासोबतच शीघ्र प्रतिसाद दलाद्वारे शहरातील चार ठाण्यांच्या हद्दीत रात्रगस्त घालण्यात येत आहे.
---------------------------
तडीपार, कुख्यात गुंडांवर नियंत्रण
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी जिल्ह्यात गत काही महिन्यांपूर्वी ‘आॅपरेशन आॅल आउट’ राबविले होते. यामध्ये रात्रीच्या दरम्यान कु ख्यात गुंड, तडीपार आरोपी यांना पकडण्यात आले होते. त्यानंतर आता अकोला पोलीस प्रशासनाने ‘शीघ्र प्रतिसाद दल’ रात्रगस्तीला कार्यरत केल्यामुळे कुख्यात गुंडांवर नियंत्रण राहणार असून, तडीपार असलेल्या आरोपींचा शोध लावण्यात मदत होणार आहे.

 

Web Title: 'Quick Response Team' for support to Police at Night petroling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.