पॉली हाउस उभारणीकडे कल; शेतकऱ्यांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 02:30 PM2019-01-05T14:30:34+5:302019-01-05T14:30:55+5:30

अकोला : जिल्ह्यातील शेतकरी आता हरितगृह तंत्रज्ञानाकडे वळत असून, शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाची पुरेपूर माहिती देण्यासाठी कृषी विज्ञान कें द्राच्यावतीने शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

  Policy House Training for farmers |  पॉली हाउस उभारणीकडे कल; शेतकऱ्यांना प्रशिक्षण

 पॉली हाउस उभारणीकडे कल; शेतकऱ्यांना प्रशिक्षण

googlenewsNext

अकोला : जिल्ह्यातील शेतकरी आता हरितगृह तंत्रज्ञानाकडे वळत असून, शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाची पुरेपूर माहिती देण्यासाठी कृषी विज्ञान कें द्राच्यावतीने शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या तंत्रज्ञानामुळे तापमान, आर्द्र्रता व पाणी हे सर्व घटक कृत्रिमरीत्या नियंत्रित करू न पिकांच्या वाढीसाठी असलेले आवश्यक घटक पिकांच्या अवस्थेनुसार कमी-अधिक प्रमाणात पुरविले जातात. या नियंत्रित वातावरणात सूर्यप्रकाश, कार्बनडॉय आॅक्साइड इत्यादी घटकांचा वनस्पतीच्या वाढीसाठी अधिक कार्यक्षमतेने वापर करू न मोकळ्या वातावरणापेक्षाही अधिक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. नियंत्रित वातावरणासाठी प्रामुख्याने पॉली हाउससारख्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आता आवश्यक झाल्याने पारंपरिक शेतीसोबतचशेतकरी आता या तंत्रज्ञानाकडे वळला आहे.
पॉली हाउसमुळे कमी जागेत व कमी कालावधीत जास्त उत्पन्न घेता येत असून, मजुरांना वर्षभर रोजगार उपलब्ध करू न देता येतो. विशेष म्हणजे, गुंतवलेल्या रकमेतून खात्रीशीर उत्पन्न मिळते. गारपीट, अवकाळी पाऊस, वादळवारा, दव, धुके, प्रखर तापमान या नैसर्गिक घटकांपासून पिकांचे नुकसान टाळले जाते. रोग किडींच्या प्रादुर्भावापासून पिकांचे संरक्षण करू न वेळेवर उपाययोजना करता येतात. या तंत्रज्ञानाचा वापर करू न उत्पन्नात दुप्पट ते चौपट वाढ होत असल्याने या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनातर्फे अनुदान दिले जात आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना हरितगृह बांधणी, लागवड व देखभाल या विषयासह हरितगृहाचे प्रकार व फायदे, अर्थशास्त्र, फूलशेती, भाजीपाला लागवड तसेच हरितगृहातील पिकांवरील रोग व किडींचे व्यवस्थापन आदींचे तंत्रज्ञान प्रशिक्षणाद्वारे समजावून सांगितले जात असून, आता यावर अधिक लक्ष दिले जाणार आहे.

 

Web Title:   Policy House Training for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.