बंददरम्यान हिंसा करणाऱ्या २४ आरोपींना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 12:02 PM2020-01-31T12:02:52+5:302020-01-31T12:03:03+5:30

न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनाविली आहे.

Police custody for 24accused of violence during Bharat bandh | बंददरम्यान हिंसा करणाऱ्या २४ आरोपींना पोलीस कोठडी

बंददरम्यान हिंसा करणाऱ्या २४ आरोपींना पोलीस कोठडी

Next

अकोला : केंद्र सरकारने सीएए, एनआरसी, एनपीआर यासारख्या कायद्याची अंमलबजावणी केल्यामुळे या कायद्याच्या विरोधात बुधवारी बंद पुकारण्यात आला होेता. या बंदला पातूर, बाळापूर, अकोला येथे हिंसक वळण देणाºया ४५ जणांविरोधात तीनही ठिकाणच्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी २४ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनाविली आहे.
केंद्र सरकारने सीएए, एनआरसी, एनपीआर यासारख्या कायद्याची अंमलबजावणी केली. त्यामुळे या कायद्याच्या विरोधात बुधवारी बंद पुकारण्यात आला होेता. बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित या बंदमध्ये बाळापूर, पातूर, अकोला शहरातील मुख्य बाजारपेठेत कायदा व सुव्यवस्थोचा प्रश्न निर्माण झाला होता. या बंददरम्यान आंदोलकांनी दुकाने, वाहनानांची तोडफोड केल्याच्याही घटना घडल्या असून, पोलिसांवर दगडफेक झाल्याचा प्रकार जिल्ह्यात घडला. त्यामुळे पोलीस प्रशासनाने पातूर, बाळापूर, अकोला येथील ३३ जणांवर भारतीय दंड विधानाच्या कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३५३, ३३२, ३३६, ३३७, ४२७, राष्ट्रीय महामार्ग कायदा कलम ८ ब, सहकलम महाराष्ट्र पोलीस पोलीस कायदा कलम १३५, कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३३६, ३३७, १५३ सार्वजनिक मालमत्तेची हानी पोहोचविण्यास प्रतिबंध कायदा १९८४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर बाळापूर पोलीस स्टेशनला भारतीय दंड विधानाच्या कलम १४३, ३४१, १८८, महाराष्ट्र पोलीस कायदा सहकलम १३५, तर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यातही काही आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४५२, १४३, १४७, १४९, ३४१, ३४२, १८८, १०९ सहकलम १३४, १३५, १४० क्रिमिनल लॉ अमेनमेन्ट अ‍ॅक्ट १९३५ अन्वये कलम ७ नुसार गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर अकोला पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली असता गुरुवारपर्यंत ४५ आरोपींपैकी २४ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या २४ आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीना १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनाविली आहे.

 

Web Title: Police custody for 24accused of violence during Bharat bandh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.