विरोधकही उतरले शेतकरी आंदोलनात; यशवंत सिन्हा यांना मिळतोय व्यापक पाठिंबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 02:30 AM2017-12-06T02:30:45+5:302017-12-06T02:35:11+5:30

शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे आयोजित आंदोलनाचा भाग म्हणून  माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात रविकांत तुपकर  यांच्यासह शेकडो शेतकरी दुसर्‍या दिवशीही पोलीस मुख्यालयात ठाण मांडून बसले.

Opponent also came in the agitation; Yashwant Sinha gets comprehensive support! | विरोधकही उतरले शेतकरी आंदोलनात; यशवंत सिन्हा यांना मिळतोय व्यापक पाठिंबा!

विरोधकही उतरले शेतकरी आंदोलनात; यशवंत सिन्हा यांना मिळतोय व्यापक पाठिंबा!

ठळक मुद्देकाँग्रेस, राष्ट्रवादी, भारिप, मनसे, आपचा पाठिंबा, जिल्हाभरात ‘रास्ता रोको’ 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे आयोजित आंदोलनाचा भाग म्हणून  माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात रविकांत तुपकर  यांच्यासह शेकडो शेतकरी दुसर्‍या दिवशीही पोलीस मुख्यालयात ठाण मांडून बसले.  मंगळवारी  आंदोलन स्थळाला भाजपा खासदार नाना पटोले यांनी दुपारच्या सुमारास भेट देऊन शेतकर्‍यांना  संबोधित केले. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बमसं, शिवसेना, आप, मनसे या पक्षांनीही  सिन्हा यांना पाठिंबा दर्शवत पोलीस मुख्यालयात घोषणाबाजी केली. आंदोलनाना पाठिंबा म्हणून  जिल्ह्यात बोरगाव मंजू, कोळंबी आणि राजंदा फाटा येथे विविध राजकीय पक्ष, संघटना व शे तकर्‍यांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अकोट व बाळापूर, मूर्तिजापूर येथे  प्रशासनाला निवेदन देण्यात आले. 

आमदार बच्चू कडू यांनी साधला संवाद
‘कासोधा’ परिषदेला उपस्थित राहू न शकलेले आ. बच्चू कडू मंगळवारी रात्री अकोल्यात  दाखल झाले. त्यांनी सिन्हा यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

काँग्रेसची जोरदार घोषणाबाजी 
पोलीस मुख्यालयातील शेतकर्‍यांच्या आंदोलनात दुसर्‍या दिवशीसुद्धा काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी  सहभाग घेतला आणि भाजप सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. मंगळवारी दुपारी  काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी यशवंत सिन्हा यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी  आ. बबनराव चौधरी, माजी आ. अँड. नातिकोद्दीन खतीब, जिल्हा महासचिव प्रकाश तायडे,  मनपा विरोधी पक्षनेते साजीद खान पठाण, राजेश भारती, निखिलेश दिवेकर, प्रदेश प्रवक्ता सुधीर  ढोणे, अंशुमन देशमुख, अनंत बगाडे, अविनाश देशमुख, राजेश राऊत, हरीश कटारिया,  नगरसेविका विभा राऊत, सुषमा निचळ, सीमा ठाकरे, इरफान मोहम्मद, प्रदीप वखारिया, सागर  कावरे, आकाश कवडे, शैलेश सूर्यवंशी, महेंद्र गवई, प्रशांत भटकर, मोईन खान, महेमुद खान  पठाण, विजय मुळे, मो. युसूफ, वर्षा बडगुजर, राजू इटोले आदींनी आंदोलनात सहभागी होऊन  घोषणाबाजी केली. 

तुषार गांधींनी साधला संवाद  
महात्मा गांधी यांचे पणतू व प्रख्यात गांधीवादी साहित्यिक तुषार गांधी यांनी पोलीस मुख्यालयात  यशवंत सिन्हा यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. शेतकर्‍यांच्या या आंदोलनाला पाठिंबा  दर्शवित आंदोलन अहिंसक मार्गाने सुरु ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

मनसेचे कार्यकर्ते मैदानात
शेतकरी आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी सहभागी नोंदविला. मनसेचे  आदित्य दामले, पंकज साबळे, शहराध्यक्ष सौरभ भगत, रणजित राठोड, ललित यावलकर,  सचिन गव्हाळे, शिवाजी पटोकार, रवींद्र फाटे, सतीश फाले, चंदू अग्रवाल, राजेश बाळंखे  पोलीस मुख्यालयात दिवसभर ठिय्या देऊन होते. 

भारिपचा आंदोलनात सहभाग
शेतकरी जागर मंचाच्या आंदोलनात भारिप-बमसंचे माजी आ. हरिदास भदे, जिल्हा कार्याध्यक्ष  काशीराम साबळे, जि.प. उपाध्यक्ष जमीरउल्ला खान, जि.प. सदस्य प्रतिभा अवचार, शेख  साबीर, अरुंधती सिरसाट, नगरसेविका किरण बोराखडे, अशोक सिरसाट, गजानन गवई, प्रदीप  वानखडे, बुद्धरत्न इंगोले, राजुमिया देशमुख, विकास सदांशिव, मनोहर शेळके, सचिन शिराळे,  योगेश किर्तक, रणजित वाघ, अमोल सिरसाट आदी सहभागी झाले होते. 

डॉक्टरांचाही सहभाग
शेतकरी आंदोलनामध्ये आयएमएचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम तायडे, डॉ. हर्षवर्धन मालोकार, डॉ.  अमोल रावणकर, छावाचे जिल्हा प्रमुख शंकरराव वाकोडे आदींनी भेट दिली. 

नाफेडच्या निकषांचीच चर्चा 
शेतकरी आंदोलनात सहभागी झालेले शेतकर्‍यांमध्ये दिवसभर नाफेडच्या क्लिष्ट निकषांची चर्चा  सुरु होती. अनेक शेतकर्‍यांनी नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांची कशी अडवणूक करण्यात  आली, याचे किस्से सांगितले.  

दुसर्‍या दिवशीही नाकारले प्रशासनाचे जेवण
आंदोलनकर्त्यांच्या जेवणासाठी प्रशासनाने केलेली व्यवस्था दुसर्‍यादिवशीही शेतकर्‍यांनी  नाकारली. दुपारी अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अभय पाटील यांनी तर  संध्याकाळी संग्राम गावंडे व  युवराज गावंडे यांनी सर्वांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. 

Web Title: Opponent also came in the agitation; Yashwant Sinha gets comprehensive support!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.