एका सिटी बसचा दोन ठिकाणी लोकार्पण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 02:06 AM2017-11-28T02:06:12+5:302017-11-28T02:09:03+5:30

अकोला : शहरवासीयांच्या सुविधेसाठी जानेवारी महिन्यात दाखल झालेल्या पाच सिटी बसेसपैकी चार बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यापैकी एका (पाचव्या) सिटी बसचा भाजपाच्यावतीने दोन ठिकाणी लोकार्पण सोहळा घेण्यात आल्याने सखेद आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

Opening ceremony at a city bus at two places | एका सिटी बसचा दोन ठिकाणी लोकार्पण सोहळा

एका सिटी बसचा दोन ठिकाणी लोकार्पण सोहळा

Next
ठळक मुद्दे३0 सिटी बसेसचा पत्ताच नाहीअकोलेकर प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरवासीयांच्या सुविधेसाठी जानेवारी महिन्यात दाखल झालेल्या पाच सिटी बसेसपैकी चार बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यापैकी एका (पाचव्या) सिटी बसचा भाजपाच्यावतीने दोन ठिकाणी लोकार्पण सोहळा घेण्यात आल्याने सखेद आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. गुडधी ते थेट डाबकीपर्यंत धावणार्‍या सिटी बसचा उमरी येथे महापौर विजय अग्रवाल यांच्या उपस्थितीत, तर डाबकी  येथे उपमहापौर वैशाली शेळके यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा होऊन, बस सेवेला सुरुवात करण्यात आली. शहरात सिटी बसची सेवा सुरू होऊन अकरा महिन्यांचा कालावधी होत असला, तरी उर्वरित ३0 सिटी बसेसचा अद्यापही पत्ता नसल्याचे चित्र आहे. 
शहरवासीयांच्या सुविधेसाठी शहर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेत, महापालिका प्रशासनाने ऑक्टोबर २0१६ मध्ये निविदा राबवली होती. त्यावेळी शहरात ३५ बसेसचा ताफा दाखल होणार होता. प्रशासनाने बस सेवा सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर, श्रीकृपा ट्रॅव्हल्सने सादर केलेली निविदा मंजूर करण्यात आली. पहिल्या टप्प्यात पाच बसेस आणि त्यानंतर महिनाभराच्या आत १५ बसेस व दुसर्‍या टप्प्यात उर्वरित १५ बसेस दाखल होतील, असा दावा सत्ताधारी भाजपासह प्रशासनाने केला होता. प्रत्यक्षात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पाच बसेस दाखल झाल्या. यापैकी चार बसेस रस्त्यावर धावत आहेत. अकरा महिन्यांचा कालावधी उलटत असला, तरी अद्यापही उर्वरित बसेसचा थांगपत्ता नाही. 
श्रीकृपा ट्रॅव्हल्सकडे पाचपैकी चार बसेस रस्त्यावर धावत असताना एक बस उभी होती. ही बस डाबकी ते गुडधीपर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेत सत्ताधार्‍यांनी सोमवारी सिटी बसचे चक्क दोन ठिकाणी लोकार्पण केले. महापौर विजय अग्रवाल, पूर्व झोनचे सभापती मिलिंद राऊत, रूपराव पाटील तसेच गुडधी-उमरी परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत गुडधी येथे, तसेच डाबकी येथे उपमहापौर वैशाली शेळके, भाजपाचे महानगराध्यक्ष किशोर पाटील, ज्येष्ठ समाजसेवक विष्णुपंत गंगाखेडकर, नगरसेवक अनिल गरड, सुनील क्षिरसागर, सतीश ढगे, पश्‍चिम झोन सभापती अमोल गोगे, नगरसेविका रंजना विंचनकर, नीलेश निनोरे यांच्या उपस्थितीत सिटी बस सेवेचा प्रारंभ करण्यात आला.

उर्वरित बसेस कधी?
श्रीकृपा ट्रॅव्हल्ससोबत ३५ सिटी बसेसचा करारनामा करण्यात आला आहे. अकरा महिन्यांपासून शहरात केवळ चार बसेस धावत आहेत. उर्वरित ३0 बसेसची सुविधा नसल्यामुळे शहरवासीयांची परवड होत आहे. त्यामुळे सदर बसेस शहरात कधी दाखल होतील, असा सवाल अकोलेकर उपस्थित करीत आहेत.

Web Title: Opening ceremony at a city bus at two places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.