वऱ्हाडात केवळ ४०.८७ टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 03:24 PM2018-08-12T15:24:17+5:302018-08-12T15:26:57+5:30

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांत आजमितीस ११ आॅगस्टपर्यंत पाच जिल्ह्यांत ४०.८७ टक्के जलसाठा संचयित झाला.

Only 40.87 percent water in Dams in western vidarbha | वऱ्हाडात केवळ ४०.८७ टक्केच जलसाठा!

वऱ्हाडात केवळ ४०.८७ टक्केच जलसाठा!

Next
ठळक मुद्देपश्चिम विदर्भात नऊ मोठे, २४ मध्यम, तर ४५२ लघू प्रकल्प आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील तीन धरणांतील जलसाठा शून्य टक्केच आहे. काटेपूर्णा या मोठ्या धरणात ३६.७७ टक्के जलसाठा संकलित झाला आहे.

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांत आजमितीस ११ आॅगस्टपर्यंत पाच जिल्ह्यांत ४०.८७ टक्के जलसाठा संचयित झाला. पावसाचे अडीच महिने संपत आले असताना धरणात अल्प जलसाठा असल्याने आता वऱ्हाडातील जनतेला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
पश्चिम विदर्भात नऊ मोठे, २४ मध्यम, तर ४५२ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणात ४०.८७ जलसाठा सध्या उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील तीन धरणांतील जलसाठा शून्य टक्केच आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ३६.७७ टक्के जलसाठा संकलित झाला आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ४३.२२ टक्के जलसाठा झाला आहे. उमा ३२.०२, मोर्णा धरणात २२.४१ टक्के, तर वान धरणात आतापर्यंत ५४.९६ टक्के जलसाठा संकलित झाला. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा मोठ्या धरणातील जलसाठा संपला असून, अद्याप एक थेंबही वाढ झाली नसल्याने या धरणाची पातळी शून्य टक्के आहे. याच जिल्ह्यातील मस व कोराडी मध्यम धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. तोेरणा ८.८७, तर उतावळी धरणातील पातळी १७.२३ टक्के झाली आहे. याच जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात ९.७७ टक्के, पेनटाकळी धरणात ४.८७ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १५.५० टक्के, पलढगमध्ये १२.६५ टक्के, मन धरणात १६.४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ६१.२८ टक्के, एकबुर्जी धरणात १०० टक्के, तर सोनल धरणात ४४.०३ टक्के जलसाठा आहे.
अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा धरणात ४५.६० टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ९८.९३, अरुणावती ३४.४१, तर बेंबळा धरणात ४३.६६ टक्केच जलसाठा आहे.

 

Web Title: Only 40.87 percent water in Dams in western vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.