वऱ्हाडातील जलसाठ्यात वेगाने घट; २९ टक्केच जलसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 12:38 PM2019-02-12T12:38:05+5:302019-02-12T12:38:24+5:30

अकोला: वऱ्हाडातील(पश्चिम विदर्भ) धरणांमधील जलसाठ्यात वेगाने घट होत असून, बाष्पिभवनाचा वेगही वाढत असल्याने जलसंकट निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

Only 29 percent water storage remains in resirvior | वऱ्हाडातील जलसाठ्यात वेगाने घट; २९ टक्केच जलसाठा शिल्लक

वऱ्हाडातील जलसाठ्यात वेगाने घट; २९ टक्केच जलसाठा शिल्लक

googlenewsNext

अकोला: वऱ्हाडातील(पश्चिम विदर्भ) धरणांमधील जलसाठ्यात वेगाने घट होत असून, बाष्पिभवनाचा वेगही वाढत असल्याने जलसंकट निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. पाच जिल्ह्यात आजमितीस केवळ २९.९५ टक्केच जलसाठा शिल्लक असून, बुलडाणा जिल्ह्यातील चार धरणातील जलसाठा शून्यावर पोहोचला आहे.
वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघु प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये आजमितीस १० फेब्रुवारीपर्यंत केवळ २९.९५ टक्के जलसाठा शिल्लक होता. मागीलवर्षी वऱ्हाडात पाऊस कमी झाल्याने जलसाठ्यात अपेक्षित साठा झाला नसल्याने आता उन्हाळा लागण्यापूर्वी जलसाठ्यात वेगाने घट होत आहे. बाष्पिभवनाचा वेग वाढत असून, मागच्या काही दिवसांपूर्वी ३ मि.मी. असलेला हा दर आता दुप्पट झाला असून, सोमवारी ६.२ मि.मी.पर्यंत पोहोचला आहे.
वºहाडात सर्वाधिक वाईट स्थिती बुलडाणा जिल्ह्याची असून, या जिल्ह्यातील खडकपूर्णा, मस, कोराडी धरणातील जलसाठा शून्य आहे. पेनटाकळी या मोठ्या धरणात ४.५ तर तोरणा मध्यम प्रकल्पात केवळ ५.९६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. नळगंगा मोठ्या धरणात ११.९०, ज्ञानगंगा १४.६५,पलढग १९.५७, मन २०.३१ तर उतावळी या मध्यम प्रकारच्या धरणात ३२. ५९ टक्के साठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ४१.७७ टक्के, एकबुर्जी ३३.०८ तर सोनल धरणात ३३.२२ टक्के जलसाठा शिल्लक आहे.
अमरावती जिल्ह्यातील अपर वर्धा धरणात आता केवळ २४.५५ टक्केच जलसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ५८.५३, अरुणावती ३८.५७ तर बेंबळा धरणात ३०.४५ टक्केच जलसाठा आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ४१.९१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ४२.२५ टक्के जलसाठा असून, उमा २४.१४, मोर्णा धरणात २७.५२ टक्के, तर वान धरणात ५०.१० टक्के जलसाठा आहे.

 

Web Title: Only 29 percent water storage remains in resirvior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.