ठळक मुद्देझरी बाजार येथील सुनील महल्ले यास अटक हिवरखेड पोलिसांनी केला गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरखेड : पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या झरी बाजार येथे फेसबुकवर विटंबना  केल्याप्रकरणी १४ नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीवरून   हिवरखेड पोलिसांनी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
झरी बाजार येथील सुनील सरवर महल्ले या २५ वर्षीय युवकाने एका फेसबुक  अकाउंटवर आक्षेपार्ह मजकूर टाकून एका समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी  जावेद खान अफजल खान यांनी १४ नोव्हेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून  हिवरखेड पोलिसांनी त्याच्याविरुद्ध  भादंविच्या २९५ कलमाप्रमाणे १४ नोव्हेंबर  रोजी गुन्हा दाखल करून सुनील महल्ले यास अटक केली आहे. या घटनेबाबत  माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागीय पोलीस  अधिकारी गावित यांनी झरी बाजार येथे भेट दिली. या गुन्ह्याबाबत ठाणेदार विकास  देवरे, पीएसआय शरद भस्मे, गोपाल दातीर, आकाश राठोड तपास करीत आहेत. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.