राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 05:01 PM2018-05-28T17:01:30+5:302018-05-28T17:01:40+5:30

कुरूम : भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला समोरून जबर धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २७ मे रोजी रात्री ११:०० ते १२:०० वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरिल जयकारा हाँटेल समोर घडली.

one killed in an accident on the national highway | राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Next
ठळक मुद्देसईद खाँ कदिर खाँ रा.कुरुम असे मृतकाचे नाव आहे.अमरावतीकडून अकोल्याकडे जाणारी कार क्र.एम.एच.३० ए.ए.४५९९ ने दुचाकीस जबर धडक दिली.या घटनेची माहिती मिळताच माना पोलीसांनी घटनास्थळावर धाव घेतली.


कुरूम : भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला समोरून जबर धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २७ मे रोजी रात्री ११:०० ते १२:०० वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरिल जयकारा हाँटेल समोर घडली. या धडकेत म्हैसही ठार झाली. सईद खाँ कदिर खाँ रा.कुरुम असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीवरून कुरूम येथिल रहिवासी सईद खाँ कदिर खाँ (४२) हा ग्राम नवसाळ येथुन कुरूम येथे दुचाकी क्र.एम.एच.३० ए.डि.९२२७ ने राष्ट्रीय महामार्ग क्र.६ ने येत असता अमरावतीकडून अकोल्याकडे जाणारी कार क्र.एम.एच.३० ए.ए.४५९९ ने दुचाकीस जबर धडक दिली. ही धडक एवढी भिषण होती की दुचाकीस्वार सईद खॉ व म्हैस जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच माना पोलीसांनी घटनास्थळावर धाव घेतली. याप्रकरणी माना पोलिसांनी आरोपी कार चालकाविरूध्द कलम २७९ / ३०४ अ ४२९ भादंवि नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढिल तपास ठाणेदार बि.पी.घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.चंदु पाटिल , ना.पो.काँ.राजेश वायधणे,नंदकिशोर टिकार,पो.काँ.सचिन दुबे,रामेश्र्वर कथलकर करित आहे.( वार्ताहर)

Web Title: one killed in an accident on the national highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.