रस्ता दुरुस्तीसाठी कंत्राटदाराला बजावली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 01:29 AM2017-11-11T01:29:05+5:302017-11-11T01:29:12+5:30

अकोला : जुने शहरातील भीमनगर चौक ते श्रीवास्तव चौक मार्गावर बांधण्यात आलेल्या ८४ मीटर लांब रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने लावून धरल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने शुक्रवारी संबंधित कंत्राटदाराला नोटीस जारी केली. नोटीसमध्ये मनपाच्या निकषानुसार रस्ता दुरुस्त करून देण्याचे निर्देश आहेत. 

Notice to the contractor to repair the road | रस्ता दुरुस्तीसाठी कंत्राटदाराला बजावली नोटीस

रस्ता दुरुस्तीसाठी कंत्राटदाराला बजावली नोटीस

Next
ठळक मुद्देमनपाच्या बांधकाम विभागाचा निर्णय

प्रभाव लोकमतचा
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जुने शहरातील भीमनगर चौक ते श्रीवास्तव चौक मार्गावर बांधण्यात आलेल्या ८४ मीटर लांब रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने लावून धरल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने शुक्रवारी संबंधित कंत्राटदाराला नोटीस जारी केली. नोटीसमध्ये मनपाच्या निकषानुसार रस्ता दुरुस्त करून देण्याचे निर्देश आहेत. 
जुने शहरातील भीमनगर चौक ते महाराष्ट्र टेलर ते सार्वजनिक शौचालय तसेच सार्वजनिक शौचालय ते संजय शिरसाट यांच्या घरापर्यंत एकूण ८४. ७२ मीटर लांब सिमेंट रस्त्यासाठी महापालिकेने १२ लाख रुपयांची तरतूद केली. दोन टप्प्यात बांधलेल्या सिमेंट रस्त्याचे १२ लाख रुपयांपैकी सहा लाखांचे देयक संबंधित कंत्राटदाराला मनपाच्या बांधकाम विभागाने दिवाळीपूर्वी अदा केले. सिमेंट रस्त्याचे काम अतिशय सुमार दर्जाचे झाल्याचे समोर आल्यानंतर मनपाच्या बांधकाम विभागाने धावपळ सुरू केली. रस्त्याच्या कामावर देखरेख ठेवणारे उपअभियंता सईद अहमद यांनी त्यांचे कर्तव्य किती प्रामाणिकपणे पार पाडले, याचा नमुना समोर आला आहे. शिवाय, रस्त्याची पाहणी करून अहवाल सादर करणारे कार्यकारी अभियंता अजय गुजर, शहर अभियंता इक्बाल खान यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्हे उपस्थित झाली आहेत. या प्रकरणाचा ऊहापोह झाल्यानंतर बांधकाम विभागाने तडकाफडकी मानसेवी उपअभियंता सईद अहमद यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली, तसेच कंत्राटदार प्रदीप शिरसाट यांनाही नोटीस जारी केली असून, रस्ता दुरुस्तीचे निर्देश दिले आहेत.

निकषानुसार रस्ता दुरुस्त न केल्यास..
प्रकरणाचा ऊहापोह झाल्यामुळे सुरुवातीला रस्त्यावर ‘पॅचिंग’ करून दिल्यास उर्वरित देयक अदा करण्याची भाषा वापरणार्‍या बांधकाम विभागाचा सूर आता बदलला आहे. 
पॅचिंगसाठी कमी खर्च येत असल्यामुळे कंत्राटदारही राजी झाला होता; परंतु रस्त्याची दुरवस्था ध्यानात घेता कंत्राटदाराने ‘विअरिंग कोर्स’नुसार रस्ता दुरुस्त करण्यासाठी प्रशासन आग्रही आहे. 
‘विअरिंग कोर्स’नुसार रस्ता दुरुस्त न झाल्यास तो कोणत्याही क्षणी उखडण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. 

Web Title: Notice to the contractor to repair the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.