शेतकर्‍यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्यासाठी आता नवा आदेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 07:39 PM2017-11-15T19:39:39+5:302017-11-15T20:11:24+5:30

कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शे तकर्‍यांच्या याद्या शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याचे  काम सुरू असतानाच ‘महा-ऑनलाइन’च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या नवीन ‘पोर्टल’वर पुन्हा नव्याने याद्या  ‘अपलोड’ करण्याचे बँकांना निर्देश देण्यात आले.

New order to upload 'farmers' list! | शेतकर्‍यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्यासाठी आता नवा आदेश!

शेतकर्‍यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्यासाठी आता नवा आदेश!

Next
ठळक मुद्देकर्जमाफीचे भिजत घोंगडे  आपले सरकार ऐवजी  महा-ऑनलाइनवर ‘अपलोड’ करण्याचे काम सुरु

संतोष येलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शे तकर्‍यांच्या याद्या शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याचे  काम सुरू असतानाच ‘महा-ऑनलाइन’च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी  सन्मान योजना (सीएसएमएसएसवाय) या नवीन ‘पोर्टल’वर पुन्हा नव्याने याद्या  ‘अपलोड’ करण्याचे बँकांना निर्देश देण्यात आले. त्यानुसार पुन्हा शेतकर्‍यांच्या  याद्या नवीन ‘पोर्टल’वर अपलोड करण्याचे काम बुधवारपासून सुरू करण्यात  आले. याद्या ‘अपलोड’ करण्याचे घोंगडे भिजतच असल्याने, कर्जमाफीस पात्र शे तकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले  आहे.
कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांच्या याद्या शासनाच्या  ‘आपले सरकार’ या ‘पोर्टल’वर ‘अपलोड ’ करण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती  सहकारी बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत गत महिनाभरापासून सुरू करण्यात  आले. कर्जमाफीस पात्र सर्व शेतकर्‍यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम पूर्ण  झाल्यानंतर, शासनाच्या ‘महा-आयटी’ विभागामार्फत शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन ’ याद्या  बँकांना प्राप्त होतील आणि त्यानंतर शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची र क्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या पृष्ठभूमीवर पात्र शेतकर्‍यांच्या  याद्या शासनाच्या ‘आपले सरकार’या ‘पोर्टल’वर ‘अपलोड’ करण्याचे काम काही  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत पूर्ण करण्यात आले, तर काही बँकांचे काम  पूर्ण होणे बाकी आहे. त्यामध्ये अकोला व वाशिम जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांच्या  याद्या ‘अपलोड’ करण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत शंभर टक्के  पूर्ण झाले. शेतकर्‍यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याचे काम सुरू असतानाच,  कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांच्या याद्या ‘महाऑनलाइन’च्या ‘सीएसएमएसएसवाय’  या ‘पोर्टल’वर  पुन्हा नव्याने ‘अपलोड ’ करण्याचे निर्देश शासनाच्या महा-आयटी  विभागामार्फत राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राष्ट्रीयीकृत  बँकांना देण्यात आले. त्यानुसार पुन्हा नव्याने नवीन ‘पोर्टल’वर कर्जमाफीस पात्र शे तकर्‍यांच्या याद्या ‘अपलोड ’ करण्याचे काम १५ नोव्हेंबरपासून बँकांमार्फत सुरू   करण्यात आले. शेतकर्‍यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याचे घोंगडे भिजतच  असल्याने, कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष  लाभ मिळणार केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नवीन ‘पोर्टल’वर याद्या ‘अपलोड’ करण्यातही अडचणी !
शासनाच्या ‘महा-आयटी ’ विभागाच्या निर्देशानुसार कर्जमाफीस पात्र शे तकर्‍यांच्या याद्या ‘महा-ऑनलाइन’च्या ‘सीएसएमएसएसवाय ’ या नवीन ‘ पोर्टल’वर नव्याने ‘अपलोड ’ करण्याचे काम  १५ नोव्हेंबरपासून अकोला जिल्हा  मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सुरू करण्यात आले; मात्र शेतकर्‍यांच्या याद्या नवीन  ‘पोर्टल’वर ‘अपलोड ’ करण्यातही अडचणी येत आहेत. ‘नेट कनेक्टिव्हिटी  ’अभावी ‘एरर’ येत असल्याने शेतकर्‍यांच्या याद्या ‘पोर्टल’वर ‘अपलोड’ करण्या त विलंब होत आहे, त्यामुळे कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांच्या याद्या नवीन ‘पोर्टल’वर  ‘अपलोड’ करण्याचे काम पूर्ण केव्हा होणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.
-
 

Web Title: New order to upload 'farmers' list!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.