नवी आशा; नवे संकल्प.. गुन्हेगारीमुक्त, आरोग्यदायी नववर्षाची पहाट उगवावी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:43 AM2018-01-01T00:43:19+5:302018-01-01T00:45:50+5:30

अकोला : निरोपाचे शब्द नको.. कर स्वागत उगवत्याचे, ही आपली संस्कृती. गत वर्षभरात अनेक चांगल्या, वाईट घटना, निर्णय अकोलेकरांनी अनुभवले; परंतु आलेले २0१८ हे नववर्ष नव्या स्वप्नांचे नवे संकल्प घेऊन आले आहे. या नव्या संकल्पांची ही नवीन पहाट उगवली. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व आरोग्य प्रशासनाने गतवर्षी दिलेल्या आश्‍वासनांची या नव्या वर्षात पूर्तता व्हावी, अशी अपेक्षा करूया. आलेले वर्ष गुन्हेगारीमुक्त, आरोग्यदायी ठरो..

New hope; New Resolutions .. The Day of Crime Free, Healthy New Year! | नवी आशा; नवे संकल्प.. गुन्हेगारीमुक्त, आरोग्यदायी नववर्षाची पहाट उगवावी!

नवी आशा; नवे संकल्प.. गुन्हेगारीमुक्त, आरोग्यदायी नववर्षाची पहाट उगवावी!

Next
ठळक मुद्देमोर्णा शुद्धीकरणाची मोहीम यशस्वी व्हावी!सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम पूर्ण व्हावे!बसस्थानकाचा श्‍वास व्हावा मोकळा! एमआयडीसीतील पाणी टंचाईची समस्या शिक्षण क्षेत्रासाठी आशादायी ठरावे नववर्ष!

अकोला : निरोपाचे शब्द नको.. कर स्वागत उगवत्याचे, ही आपली संस्कृती. गत वर्षभरात अनेक चांगल्या, वाईट घटना, निर्णय अकोलेकरांनी अनुभवले; परंतु आलेले २0१८ हे नववर्ष नव्या स्वप्नांचे नवे संकल्प घेऊन आले आहे. या नव्या संकल्पांची ही नवीन पहाट उगवली. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व आरोग्य प्रशासनाने गतवर्षी दिलेल्या आश्‍वासनांची या नव्या वर्षात पूर्तता व्हावी, अशी अपेक्षा करूया. आलेले वर्ष गुन्हेगारीमुक्त, आरोग्यदायी ठरो..

राज्यामध्ये अकोला शहर अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाते. गुन्हेगारीचा आलेखही येथे चढताच आहे. गतवर्षात जिल्हा व शहरात ३६ हत्या झाल्या. ५९ दरोड्यांच्या घटना घडल्या. १४६ घरफोड्या झाल्या. १९१ विनयभंग आणि ६३ बलात्काराच्या घटना घडल्या. जिल्हय़ातील गुन्हेगारी पाहता, शहरामध्ये पोलीस आयुक्तालय निर्मितीची मागणी पुढे आली. पोलीस अधीक्षकांकडून पोलीस आयुक्तालयाचा प्रस्तावही पाठविला; परंतु तीन वर्षांपासून हा प्रस्ताव गृहमंत्रालयाकडे धूळ खात पडून आहे. 
तसेच पोलीस गृहनिर्माण सोसायटीसाठी शासनाने ९७.७८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. निमवाडी परिसरातील जागेवर प्रस्तावित ३७८ घरांच्या २६ डिसेंबर रोजी निविदा निघाल्या. त्यामुळे या नवीत वर्षात पोलीस आयुक्तालयासोबतच पोलिसांसाठी महत्त्वाच्या असलेल्या घरांची निर्मिती व्हावी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण यावे, अशी अपेक्षा अकोलेकरांना आहे. आरोग्याच्या बाबतीतही विचार केल्यास, केंद्र शासनाने मंजूर केलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम सुरू आहे. नववर्षामध्ये अकोलेकरांच्या सेवेत सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल रुजू व्हावे, अशी अपेक्षा आहे. तसेच शिवापूर येथे प्रस्ताविक जिल्हा सामान्य रुग्णालयाचा मार्ग मोकळा व्हावा आणि त्याची वर्षपूर्ती व्हावी, शिक्षण क्षेत्रातील गोंधळ संपून शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी विद्यादायी हे नववर्ष ठरावे, अशी अपेक्षा शिक्षकांना आहे. 

मोर्णा शुद्धीकरणाची मोहीम यशस्वी व्हावी!
अकोला शहरातून वाहणार्‍या मोर्णा नदीच्या शुद्धीकरणाची मोहिम प्रशासने हाती घेतली आहे. १३ जानेवारीपासून सुरु होणारी ही मोहीम लोकसहभागातून यशस्वी झाली तर शहरासाठी ती मोठी उपलब्धी ठरणार आहे. जिल्हाधिकार्‍यांनी हाती घेतलेल्या या मोहिमेला सर्वच स्तरातून सहकार्य मिळायला हवे.

सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम पूर्ण व्हावे!
केंद्र शासनाने शहरात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर केले. या हॉस्पिटलच्या बांधकामास सुरुवात झाली आहे. या हॉस्पिटलचे बांधकाम गतीने करून नव्या वर्षामध्ये अकोलेकरांच्या सेवेत हे हॉस्पिटल अर्पण व्हावे आणि रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात. 

बसस्थानकाचा श्‍वास व्हावा मोकळा! 
अकोला आगार क्रमांक एक प्रमाणेच आगार दोनची इमारतही अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे. जर समोरचे अतिक्रमण काढले गेले, तर अकोला आगार क्रमांक दोनच्या मध्यवर्ती बसस्थानकाचा श्‍वास मोकळा होऊ शकतो, येत्या नूतन वर्षात हे अपेक्षित आहे.

एमआयडीसीतील पाणी टंचाईची समस्या 
अकोल्याची औद्योगिक वसाहत अमरावती विभागात सर्वात जास्त महसूल देणारी असली तरी येथील समस्यांकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. एमआयडीसीमधील पाणी टंचाईची समस्या  गेल्या अनेक वर्षांपासून आहे. यंदा मजीप्राने १७ कोटींची पाणी पुरवठा पाइपलाइन टाकण्याचा प्रस्ताव पाठविला आहे, आगामी वर्षात तरी ही समस्या सुटेल, अशी अपेक्षा शेकडो उद्योजकांना लागली आहे.

शिक्षण क्षेत्रासाठी आशादायी ठरावे नववर्ष!
गत वर्षभरामध्ये शिक्षणविरोधी अनेक घटना घडल्या. जि.प.च्या १३१४ शाळा बंद केल्या. पटसंख्या घटल्याने शिक्षक अतिरिक्त ठरले. ‘बीएलओ’ने काम नाकारल्यामुळे शिक्षकांवर गुन्हे दाखल झाले. आता शाळांचे खासगीकरण करून शिक्षकांना देशोधडीला लावण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे आलेले नवे वर्ष शिक्षण आणि शिक्षकांसाठी आशादायी जावो, अशी अपेक्षा शिक्षकांना आहे.

Web Title: New hope; New Resolutions .. The Day of Crime Free, Healthy New Year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.