राष्ट्रीय ग्राहक दिन विशेष:  ग्राहक हक्क कायद्याविषयी ग्राहक उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 01:53 PM2018-12-24T13:53:09+5:302018-12-24T13:57:02+5:30

अकोला: ग्राहक कायदा, फसवणूक झाल्यावर विक्रेत्याची तक्रार याविषयी ग्राहक उदासीन असल्याचे समोर आले.

National Customer Dayl: Customer unaware about the consumer rights law | राष्ट्रीय ग्राहक दिन विशेष:  ग्राहक हक्क कायद्याविषयी ग्राहक उदासीन

राष्ट्रीय ग्राहक दिन विशेष:  ग्राहक हक्क कायद्याविषयी ग्राहक उदासीन

googlenewsNext
ठळक मुद्दे फसवणूक झाल्यानंतर ९0 टक्के ग्राहक तक्रार करीत नाही.ग्राहक हक्क कायद्याविषयी ग्राहकांना माहितीच नसल्यामुळे दाद मागायची तरी कुठे, असा प्रश्न निर्माण होतो.अनेकांनी वजन, एक्सपायरी डेट, पदार्थांमध्ये भेसळ आदी बाबी पाहतच नसल्याचे सांगितले.

अकोला: बाजारपेठेत गेल्यावर जीवनावश्यक वस्तूंसोबतच इतर वस्तू खरेदी करताना किंमत, वजन, एक्सपायरी डेट, भेसळ आदींबाबत ग्राहकांची सर्रास फसवणूकच केल्या. आॅनलाइन खरेदीमध्ये फसवणूक झाल्याचे प्रकार अनेकदा घडले आहे. फसवणूक झाल्यानंतर ९0 टक्के ग्राहक तक्रार करीत नाही. एवढेच काय तर ग्राहक हक्क कायद्याविषयी ग्राहकांना माहितीच नसल्यामुळे दाद मागायची तरी कुठे, असा प्रश्न निर्माण होतो.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त लोकमतच्यावतीने शंभर सर्वसामान्य नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणादरम्यान अनेकांनी वजन, एक्सपायरी डेट, पदार्थांमध्ये भेसळ आदी बाबी पाहतच नसल्याचे सांगितले. ग्राहक कायदा, फसवणूक झाल्यावर विक्रेत्याची तक्रार याविषयी ग्राहक उदासीन असल्याचे समोर आले.
दैनंदिन जीवनाश्यक वस्तू, किराणा खरेदी करण्यासाठी प्रत्येक ग्राहकाला व्यापारी, दुकानदार, कंपन्यांकडे जावे लागते. खरेदी केलेल्या वस्तू अनेकदा खराब निघतात. किराणा मालाच्या वजनातही अनेकदा तूट असते. भाजी बाजारात गेल्यावर तेथील वजनकाटे संशयास्पद असतात. भाजीपाल्यात तर सर्रास तूट आढळून आली. फसवणूक होऊन ग्राहक गप्प बसतात. अनेक कंपन्यांच्या खाद्यपदार्थांच्या पाकिटांवर दिलेले वजन आणि प्रत्यक्षात पदार्थाचे वजन यात मोठी तफावत असते. अनेकदा ग्राहक वस्तू करताना उत्पादनाची एक्सपायरी डेट, वजन, त्यातील भेसळसुद्धा पाहत नाही. फसवणूक झालेल्या ग्राहकाला संबंधित विक्रेत्याविरुद्ध ग्राहक हक्क कायद्यानुसार न्याय मागण्याचा अधिकार आहे; परंतु या अधिकाराविषयीच ग्राहक अनभिज्ञ आहे. ग्राहकाची फसवणूक केल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित विक्रेत्याला शिक्षा व ग्राहकाला मनस्ताप झाल्याबद्दल नुकसानभरपाई मिळण्याची कायद्यात तरतूद आहे. कायद्याने ग्राहकाला संरक्षण दिले असले तरी कायद्याबद्दल माहितीच नसल्याने, अनेक ग्राहकांची फसवणूक होते. अनेकांना कायद्याची जाण असतानाही, त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचेही दिसून येते.

Web Title: National Customer Dayl: Customer unaware about the consumer rights law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.