मोर्णा स्वच्छतेचा ध्यास कायम; नदी स्वच्छतेसाठी सरसावले हजारो अकोलेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 04:08 PM2018-03-17T16:08:22+5:302018-03-17T16:25:25+5:30

अकोला: मराठी नववर्षाच्या पुर्वसंध्येवर शनिवारी हजारो अकोलेकरांनी मोर्णा स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला. शनिवारी सकाळी ८ वाजल्यापासून दगडी पुला जवळील गुलजार पुरा परिसरातील नदी काठावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

Morna continues to maintain cleanliness; Thousands of Akolekar have come to clean the river | मोर्णा स्वच्छतेचा ध्यास कायम; नदी स्वच्छतेसाठी सरसावले हजारो अकोलेकर

मोर्णा स्वच्छतेचा ध्यास कायम; नदी स्वच्छतेसाठी सरसावले हजारो अकोलेकर

Next
ठळक मुद्देगुलजार पुरा परिसरातील नदी काठावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. जिल्हाधिकारीसह वाशिमच्या पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील महापौरसह लोकप्रतिनिधी, नगरसेवकांचा सहभागक्रिडा प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांसह जिल्हा क्रिडा प्रशिक्षण केद्रांचे अधिकारी/कर्मचारी सहभागी.


अकोला: मराठी नववर्षाच्या पुर्वसंध्येवर शनिवारी हजारो अकोलेकरांनी मोर्णा स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला. शनिवारी सकाळी ८ वाजल्यापासून दगडी पुला जवळील गुलजार पुरा परिसरातील नदी काठावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी जेसीबीद्वारे काढण्यात आलेली जलकुंभी तसेच प्लॅस्टिकचा कचरा नागरीकांनी नदीकाठावर गोळा केला.
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, वाशिमच्या जिल्हा पोलीस अधिक्षक तथा अकोला जिल्हाधिकारी यांच्या पत्नी मोक्षदा पाटील, महापौर विजय अग्रवाल, नगरसेवक अजय वाघमारे, शशी चोपडे, आशिष पवित्रकार, उषा विरक, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसिलदार राजेश्वर हांडे, राहुल तायडे ,जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर यांच्यासह गुलजार पु-यातील नागरीकासह हजारो नागरीकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.
पोलिस निरीक्षक गजानन मराठे, पोलिस उपनिरीक्षक ईश्वर अंबुले, कवायत इन्चार्ज केशव घाटे, सोनाजी चांभारे यांच्यासह शंभर पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षणार्थींनी एकत्र येऊन दगडी पुलाच्या जवळील गुलजार पुरा परिसरातील मोर्णाच्या काठावर नदीतून जलकुंभी बाहेर काढून स्वच्छता केली. जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता अकुंर देसाई यांच्या नेतृत्वात जलसंपदा विभागाच्या ४०० हून अधिक अधिकारी व कर्मचारी यांनी मोहिमेत भाग घेतला. जिल्हा क्रिडा अधिकारी गणेश कुलकर्णी व क्रिडा प्रबोधिनीचे प्राचार्य सतिश भट यांच्यासह क्रिडा प्रबोधिनी व जिल्हा क्रिडा प्रशिक्षण केंद्राचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी श्री शिवाजी महाविदयालयाचे डॉ. संजय तिडके यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे विदयार्थी ,विदर्भ जल विद्यूत प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता भारत धोंगळे यांच्यासह त्यांच्या विभागाचे अधिकारी/कर्मचारी, राम कुटे यांच्यासह शुअर विन अकॅडमीचे विद्यार्थी, नेहरू युवा केद्राचे जिल्हा समन्वयक यांच्यासह नेहरू युवा केंद्र संघटनाचे कार्यकर्ते, गटविकास अधिकारी दिलीप पाटील यांच्यासह पंचायत समिती अकोल्याचे कर्मचारी, धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे अधिकारी/कर्मचारी, अकोला डेन्टंल असोशिएशनचे पदाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे कार्यकर्ते,महसुल व मनपा कर्मचारी व अधिकारी, गजानन भांबूरकर यांच्यासह वैष्णव शिंपी समाज मंडळाचे सदस्य, सेवा फाऊंडेशन, अनुलोमचे कार्यकर्ते, निमा संघटना, निर्भय बनो जनआंदोलन, जिजाबाई महिला बचतगट, माऊली बचतगट, सावित्रीबाई महिला मंडळ, लोकसेवा संघ , लघु व्यवसायी व्यापारी विकास संघटना , गव्यंम सोशल वेलफेअर सोसायटी, पराग गवई मित्रमंडळ आदींनी सहभाग नोंदविला.आयुर्वेदिक महाविद्यालयाचे तसेच गव्यंम सोशल वेलफेअर सोसायटीचे डॉ.कृष्णमुरारी शर्मा यांनी स्वच्छता मोहिमेत आरोग्य सेवा पुरवित आहे.

 

Web Title: Morna continues to maintain cleanliness; Thousands of Akolekar have come to clean the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.