लोकमत न्यूज नेटवर्क
दहीहांडा : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गांधीग्राम येथील १७ वर्षीय मुलीस एकाने फूस लावून पळविल्याची घटना १७ जून रोजी घडली. मुलीच्या शोधासाठी दहीहांडा पोलिसांनी पथकांची स्थापना केली आहे.
गांधीग्राम येथील १७ वर्षीय मुलीस गावातीलच इरफान खा मुस्तफा खा पठाण याने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून दहीहांडा पोलिसांनी युवकाविरुद्ध कलम ३६३,३६६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार वनारे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय दोनकलवार करीत आहेत.