गोरक्षण रोडचा मध्यबिंदू काढण्यासाठी मोजमाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 02:21 AM2017-10-18T02:21:07+5:302017-10-18T02:21:18+5:30

अकोला : गोरक्षण रोडवरील महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. रस्त्यालगतच्या मालमत्ता हटवून रस्ता रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मंगळवारी गोरक्षण रोडचे मोजमाप करीत मध्यबिंदू काढला. यावेळी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

Measurement for removal of the center of Gorakhya Road | गोरक्षण रोडचा मध्यबिंदू काढण्यासाठी मोजमाप

गोरक्षण रोडचा मध्यबिंदू काढण्यासाठी मोजमाप

Next
ठळक मुद्देमहापालिका, ‘पीडब्ल्यूडी’ची यंत्रणा रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गोरक्षण रोडवरील महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. रस्त्यालगतच्या मालमत्ता हटवून रस्ता रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मंगळवारी गोरक्षण रोडचे मोजमाप करीत मध्यबिंदू काढला. यावेळी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 
नेहरू पार्क चौक ते संत तुकाराम चौकापर्यंतच्या गोरक्षण रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे. यादरम्यान, महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंत रस्त्याची रुंदी कमी असून, स्थानिक रहिवाशांच्या मालमत्तांचा रस्ता रुंदीकरणाला अडथळा निर्माण झाला आहे. 
रुंदीकरणाआड येणार्‍या मालमत्ता हटविण्यासाठी मध्यंतरी महापालिका प्रशासनाने इमारतींचे मोजमाप घेतले होते. तूर्तास रस्त्याच्या दोन्ही बाजूने प्रत्येकी साडेचार मीटरचे खोदकाम करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. खोदकामावेळी अडथळा ठरणार्‍या मालमत्ता हटविल्या जातील. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्यामुळे मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने गोरक्षण रोडचा मध्यबिंदू काढण्यासाठी रस्त्याचे मोजमाप घेतले.

Web Title: Measurement for removal of the center of Gorakhya Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.