आदिवासींच्या कन्यादानमध्ये मंगळसूत्र घोटाळा; ३४४ मंगळसूत्रांपैकी ४१ जोडप्यांनाच वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:36 PM2018-07-24T12:36:47+5:302018-07-24T12:40:15+5:30

अकोला : आदिवासी जोडप्यांना कन्यादान योजनेतून दिल्या जाणाऱ्या सोन्याचे मंगळसूत्र व संसारोपयोगी वस्तूंची प्रत्यक्ष खरेदी व केलेल्या पुरवठ्यात लाखोंचा घोटाळा झाल्याची माहिती आहे.

Mangalsutra scam in tribal scheme; | आदिवासींच्या कन्यादानमध्ये मंगळसूत्र घोटाळा; ३४४ मंगळसूत्रांपैकी ४१ जोडप्यांनाच वाटप

आदिवासींच्या कन्यादानमध्ये मंगळसूत्र घोटाळा; ३४४ मंगळसूत्रांपैकी ४१ जोडप्यांनाच वाटप

googlenewsNext
ठळक मुद्दे२००५-०६ मध्ये कन्यादान योजना राबवताना घोटाळा झाल्याचे पुढे आले आहेअकोल्यातील खंडेलवाल अलंकार ज्वेलर्सने ३४४ मंगळसूत्रांचा पुरवठा केला.प्रकल्प कार्यालयातील नोंदीनुसार केवळ ४१ मंगळसूत्र आणि संसारोपयोगी वस्तूंचे वाटप झाल्याचे आढळून आले.

-  सदानंद सिरसाट
अकोला : आदिवासी जोडप्यांना कन्यादान योजनेतून दिल्या जाणाऱ्या सोन्याचे मंगळसूत्र व संसारोपयोगी वस्तूंची प्रत्यक्ष खरेदी व केलेल्या पुरवठ्यात लाखोंचा घोटाळा झाल्याची माहिती आहे. २००५-०६ मध्ये झालेल्या या घोटाळ््यात तत्कालीन प्रकल्प अधिकारी अरुणकुमार जाधव, एस.व्ही. बोबडे यांच्यावर फौजदारी कारवाईची टांगती तलवार आहे. मागणी केलेल्या ३४४ पैकी ४१ मंगळसूत्रांचेच लाभार्थींना वाटप झाले. त्यासाठी २० लाखांपेक्षाही अधिक निधी खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहे.
शासनाने नियुक्त केलेल्या उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एम.के. गायकवाड यांच्या समितीचा अहवाल शासनाकडे सादर झाला आहे. त्यानुसार विविध योजनांमध्ये घोटाळा केलेल्या अधिकाºयांवर फौजदारी कारवाईचे निर्देश सध्याच्या प्रकल्प अधिकाºयांना देण्यात आले. अकोला प्रकल्पासाठी प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार २००५-०६ मध्ये कन्यादान योजना राबवताना घोटाळा झाल्याचे पुढे आले आहे. ३६० ते ४०० सामूहिक विवाहासाठी त्यावर्षी अनुदान देण्यात आले. त्यावेळी मागणीनुसार अकोल्यातील खंडेलवाल अलंकार ज्वेलर्सने ३४४ मंगळसूत्रांचा पुरवठा केला. त्याची किंमत २० लाख ६४ हजार रुपये होती. तेवढ्याच संख्येत संसारोपयोगी वस्तूंचाही पुरवठा दुसºया प्रतिष्ठानकडून झाल्याची माहिती आहे. आदिवासी विकास विभागाच्या अकोला प्रकल्प कार्यालयातील नोंदीनुसार केवळ ४१ मंगळसूत्र आणि संसारोपयोगी वस्तूंचे वाटप झाल्याचे आढळून आले. त्याची किंमत अनुक्रमे ९ लाख ७१ हजार व ८ लाख २५ हजार रुपये आहे. त्यापैकी केवळ ४ लाख १० हजार रुपयांच्या मंगळसूत्रांचे वाटप झाले. त्यावेळी खर्च झालेल्या ४ लाख १० हजार रुपये वगळून ३५ लाख ८९ हजारांचे काय झाले, याची कोणतीच नोंद आदिवासी विकास विभागाकडे नाही. त्यामुळे मंगळसूत्र आणि संसारोपयोगी वस्तूंसाठी असलेल्या ३५ लाख ८९ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाºयांवर फौजदारी कारवाईची टांगती तलवार असल्याची माहिती आहे.
३४३ मंगळसूत्रे गेली कुठे?
अकोल्यातील खंडेलवाल अलंकार ज्वेलर्सने मागणीनुसार ३४४ मंगळसूत्रांचा पुरवठा केल्याची नोंद आहे. मात्र, कार्यालयातील वस्तू वाटप नोंदवहीनुसार केवळ ४१ जोडप्यांनाच वाटप झाले. त्यामुळे उर्वरित ३४३ मंगळसूत्रे गेली कोठे की त्याचा पुरवठाच झाला नाही, ही बाब आता फौजदारी कारवाईतून पुढे येण्याचीही शक्यता आहे.

 

Web Title: Mangalsutra scam in tribal scheme;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.