विदर्भात किमान तापमानात प्रचंड घट; अकोला गारठले @ ९.८! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 11:35 PM2017-12-19T23:35:18+5:302017-12-20T00:35:35+5:30

अकोला : दोन दिवसांपासून विदर्भात किमान तापमानात प्रचंड घट झाली असून, ब्रम्हपुरी व नागपूर येथील किमान तापमान ८.९ अंश खाली आले. वर्धा ९.५ तर अकोल्याचे किमान तापमान ९.८ पर्यंत घटल्याने नागरिकांना हुडहुडी भरली.

Lowest temperature in Vidarbha; Akola gharathale @ 9.8! | विदर्भात किमान तापमानात प्रचंड घट; अकोला गारठले @ ९.८! 

विदर्भात किमान तापमानात प्रचंड घट; अकोला गारठले @ ९.८! 

Next
ठळक मुद्देविदर्भात सर्वाधिक कमी तापमान ब्रम्हपुरी व नागपूर येथे ८.९थंडीचा फायदा हरभरा, गहू पिकाला होईल, असे कृषी तज्ज्ञांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : दोन दिवसांपासून विदर्भात किमान तापमानात प्रचंड घट झाली असून, ब्रम्हपुरी व नागपूर येथील किमान तापमान ८.९ अंश खाली आले. वर्धा ९.५ तर अकोल्याचे किमान तापमान ९.८ पर्यंत घटल्याने नागरिकांना हुडहुडी भरली.
मागील पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली होती. रात्रीचे तापमान तर २१ अंशांपर्यंत पोहोचल्याने थंडी गायब झाली होती; परंतु तीन दिवसांपासून अचानक किमान तापमान घटले असून, थंडीत वाढ झाली. 
दरम्यान, मागील चोवीस १९ डिसेंबर सांयकाळी ५.३0 वाजतापर्यंत ब्रम्हपुरी व नागपूर येथील किमान तापमान ८.९ अंश होते, वर्धा ९.५ तर अकोल्याचे किमान तापमान ९.८ पर्यंत खाली आले. यवतमाळ १0.४, वाशिम १0.0, बुलडाणा ११.५ तर अमरावती व चंद्रपूरचे किमान तापमान ११.६ अंशाने खाली आले.
 सध्या ढगाळ वातावरण असून, वातावरणात गारवा वाढला. मंगळवारी गारव्यात पुन्हा वाढ झाल्याने नागरिकांनी गरम कपडे बाहेर काढले. या थंडीचा फायदा हरभरा, गहू पिकाला होईल, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. 

Web Title: Lowest temperature in Vidarbha; Akola gharathale @ 9.8!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.