Lok Sabha Election 2019 : राष्ट्रवादीत सुंदोपसुंदी; काँग्रेससाठी धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 03:04 PM2019-03-26T15:04:56+5:302019-03-26T15:04:59+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसची चमू हिदायत पटेल यांच्यासाठी सरसावल्याचे चित्र दिसत असले तरी राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद पटेल यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे

  Lok Sabha Election 2019: Round of talks in NCP; Alarming for the Congress | Lok Sabha Election 2019 : राष्ट्रवादीत सुंदोपसुंदी; काँग्रेससाठी धोक्याची घंटा

Lok Sabha Election 2019 : राष्ट्रवादीत सुंदोपसुंदी; काँग्रेससाठी धोक्याची घंटा

Next

अकोला: लोकसभा निवडणुकीसाठी अकोला मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्यावतीने हिदायत पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अर्थात, राष्ट्रवादी काँग्रेसची चमू हिदायत पटेल यांच्यासाठी सरसावल्याचे चित्र दिसत असले तरी राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद पटेल यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. सोमवारी पक्षाच्यावतीने वेगवेगळ््या ठिकाणी तीन बैठका पार पडल्या असता त्यामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकमेकांकडे पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले.
केंद्रातून भाजपला खाली खेचण्यासाठी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीचे गठन केले आहे. २०१४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणे पसंत केले. त्याचे परिणामही दिसून आले. चुकीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यंदाच्या लोकसभा निवडणुकीसह विधानसभा निवडणुकीतही आघाडी कायम राहणार असल्याचे दोन्ही पक्षांनी स्पष्ट केले. अकोला लोकसभा मतदारसंघातून आघाडीच्यावतीने पुन्हा एकदा हिदायत पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तबत करण्यात आले आहे. दोन्ही पक्ष एकदिलानेकाम करतील अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे. असे असले तरी मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची परिस्थिती आहे. त्याचे प्रत्यंतर सोमवारी वेगवेगळ््या ठिकाणी तीन बैठकांमधून समोर आले. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर पुढील नियोजनासाठी राष्ट्रवादीच्यावतीने बैठकांचे आयोजन करण्यात आले. बैठकीच्या आयोजनावर कोणालाही आक्षेप नसला तरी तीनही बैठकांमध्ये गटातटात विभागलेल्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याची माहिती आहे.

अशा पार पडल्या बैठकी
सकाळी ११.३० वाजता सिंधी कॅम्प परिसरातील पक्ष कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला बोटावर मोजता येणाºया पदाधिकारी-कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. दुपारी १२ वाजता गांधी रोडस्थित पक्ष कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता कौलखेड परिसरात जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली.


होर्डिंग-बॅनरवर छायाचित्र नको!
राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गटातील मतभेद टोकाला गेल्याची माहिती आहे. शहराच्या राजकारणावर पकड असलेल्या एका गटाने नाहक कटकट नको या उद्देशातून पक्षाच्या होर्डिंग-बॅनरवर एकमेकांचे छायाचित्र न छापण्याची भूमिका घेतली आहे. कार्यक्रमाचा जो आयोजक असेल त्याने त्यांच्यापुरते छायाचित्र छापावेत, असा अलिखित नियम घालून घेतल्याची माहिती आहे.

 

Web Title:   Lok Sabha Election 2019: Round of talks in NCP; Alarming for the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.