लहुजी शक्ती सेनेने केले लोटांगन आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 12:42 PM2019-02-05T12:42:55+5:302019-02-05T12:44:33+5:30

अकोला : मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लहुजी शक्ती सेना अकोला जिल्हा शाखेच्यावतीने सोमवारी शहरातील रेल्वे स्टेशन ते बसस्थानकापर्यंत लोटांगन आंदोलन करण्यात आले.

Lahuji Shakti Sena committed the Lotangan movement! | लहुजी शक्ती सेनेने केले लोटांगन आंदोलन!

लहुजी शक्ती सेनेने केले लोटांगन आंदोलन!

Next

अकोला : मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लहुजी शक्ती सेना अकोला जिल्हा शाखेच्यावतीने सोमवारी शहरातील रेल्वे स्टेशन ते बसस्थानकापर्यंत लोटांगन आंदोलन करण्यात आले.
मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी लहुजी शक्ती सेनेच्यावतीने अकोला शहरातील रेल्वे स्टेशनपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रस्त्यावर लोटांगन आंदोलन आयोजित करण्यात आले होते. रेल्वे स्टेशनपासून सुरू झालेल्या लोटांगन आंदोलनात लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी रस्त्यावर लोटांगन घेत मातंग समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. लोटांगन आंदोलनाची माहिती मिळताच आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी सायंकाळी जिल्हाधिकारी मध्यवर्ती बसस्थानक चौकात पोहोचले. आंदोलकांच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाºयांसोबत चर्चा झाल्यानंतर लोटांगन आंदोलनाची सांगता करण्यात आली. या लोटांगन आंदोलनात लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे, जिल्हाध्यक्ष गजानन ऊर्फ तात्या सोनोने, शहरप्रमुख राहुल तायडे, विदर्भ संपर्कप्रमुख श्रीकृष्ण चव्हाण, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा बोदडे, कृष्णा तायडे, अजय गायकवाड, लखन खवडे, शेषराव खवडे, अनिल धुरदेव, दशरथ गायकवाड, कैलास खंदारे, नीलेश वानखडे यांच्यासह लहुजी शक्ती सेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

‘या’ मागण्यांसाठी केले लोटांगन आंदोलन !
-तामिळनाडू राज्याप्रमाणे घटनेच्या कलम १५ (४) व १६ (४) नुसार मातंग समाजाला शिक्षण व नोकºयांमध्ये स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे तसेच अनुसूचित जातीमध्ये अ, ब, क, ड नुसार वर्गवारी करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात यावी.

  • -साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा.
  • -संगमवाडी पुणे येथील आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे काम तत्काळ सुरू करण्यात यावे.
  • -अनुसूचित जातीतील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारच्या समाजकल्याण, कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय,फलोत्पादन आणि इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाºया योजनांमध्ये बिहार राज्याप्रमाणे अ,ब,क,ड वर्गवारी करून अनुसूचित जातीप्रमाणे उपेक्षित मातंग समाज व इतर जातींना सामाजिक न्याय देण्यात यावा.
  • -आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा पुतळा विधान भवन व संसद भवनाजवळ उभारण्यात यावा.
  • -सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील प्रतापूर येथील पीर साहेब यात्रेत पोलिसांनी केलेल्या लाठीमाराची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी.

 

 

Web Title: Lahuji Shakti Sena committed the Lotangan movement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.