कावडयात्रा : हर्र बोला महादेवच्या गजराने दुमदुमले अकोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 06:23 PM2018-09-03T18:23:26+5:302018-09-03T19:47:02+5:30

अकोला : श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी ७३ वर्षांच्या परंपरेनुसार अकोला शहरात कावड -पालखी उत्सव साजरा करण्यात आला.

Kabadavatra: Har har Mahadev's chanting in Akola | कावडयात्रा : हर्र बोला महादेवच्या गजराने दुमदुमले अकोला

कावडयात्रा : हर्र बोला महादेवच्या गजराने दुमदुमले अकोला

Next
ठळक मुद्देहजारो शिवभक्त कावडधारी मंडळांसह युवकांनी जलाभिषेक केला.शिवभक्त मंडळाच्यावतीने पालखी धार्मिक व सामाजिक संदेश देणारे देखावे साकारले होते. कावड महोत्सव पाहण्यासाठी हजारो नागरीकांनी गर्दी केली होती.

अकोला : श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी ७३ वर्षांच्या परंपरेनुसार अकोला शहरात कावड -पालखी उत्सव साजरा करण्यात आला. ‘हर्र ऽ ऽ ऽ बोला महादेव’च्या गजरात ग्रामदैवत श्री राज राजराजेश्वराला हजारो शिवभक्त कावडधारी मंडळांसह युवकांनी जलाभिषेक केला. 
 पालखी-कावड उत्सव पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली. कावड यात्रा मार्गाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. शहरात कावड-पालखी उत्सव साजरा करण्यात आला. कावड-पालखी मिरवणुकीत शहरातील शेकडो शिवभक्त मंडळांनी सहभाग घेतला. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘हर्र ऽ ऽ ऽ बोला महादेव’ असा जयघोष करीत शिवभक्त राजराजेश्वर मंदिरात जाऊन प्रर्दशिणा घालून जलाभिषेक करीत होते. कावड यात्रेतील शिवभक्तांचे व पालखीचे शहरातील सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनेच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. शिवभक्त मंडळाच्यावतीने पालखी धार्मिक व सामाजिक संदेश देणारे देखावे साकारले होते. कावड महोत्सव पाहण्यासाठी हजारो नागरीकांनी गर्दी केली होती.


Web Title: Kabadavatra: Har har Mahadev's chanting in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.