राणी सतीच्या भादवा उत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By atul.jaiswal | Published: August 18, 2017 01:46 PM2017-08-18T13:46:40+5:302017-08-18T13:47:01+5:30

Inspiring response of devotees to Queen Satti Bhadwa festival | राणी सतीच्या भादवा उत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राणी सतीच्या भादवा उत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next
ठळक मुद्देमंगलपाठात महिलांची गर्दी


अकोला: स्थानीय राणी सती धाम येथे राणी सती दादी यांच्या वार्षिक भादवा बदी सप्ताहाला उत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.दादी यांचा हा पावन उत्सव सप्ताह हा कृष्ण जन्माष्टमी पासून प्रारंभ झाला असून हा उत्सव २१ आॅगस्ट पर्यंत चालणार आहे.
दरम्यान उत्सवस्थळी मुंबईचे गायक प्रमोद शर्मा यांचा दादी मंगलपाठ होत असून याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शनिवार दि.१९ आॅगस्ट रोजी दु.४ वा.राणी सती धाम येथे सामूहिक सुंदरकांड होणार असून रात्री ७.३० वा. दिल्ली येथील भजनकार शिखा भार्गव यांची भव्य भजन संध्या होणार आहे. रविवार दि.२० आॅगस्ट रोजी दु. २ वा. हवन कार्यक्रम होऊन सायंकाळी छप्पन भोग दर्शन सोहळा होणार आहे. सप्ताह उत्सवाची पूणार्हुती सोमवार दि.२१ आॅगस्ट रोजी अमावास पूजन व दुपारी होणाºया महिलांच्या सामूहिक मंगलपाठाने होणार आहे. उत्सवाला जत्रेचे स्वरूप आले असून कार्यक्रमस्थळी विविध स्टॉल व झुले लावण्यात आले आहेत.
या पावन उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आहवान उत्सव यजमान अजय केडिया, मयूर खत्री, द्वारकादास अग्रवाल, कैलाशचंद्र अग्रवाल मामाजी, त्रिलोकचंद अग्रवाल, पुरुषोत्तम पसारी, लक्ष्मीकांत सुरेका, नंदकिशोर खेतान, सचिन अग्रवाल, मनोज बगडिया, कनैयालाल लोहिया, राणी सती धाम चे अध्यक्ष जगदीश बाचुका, नवीन झुनझुनवाला, गणपतराय खेतान, जगदीश मित्तल ,सीताराम झुनझुनवाला, बजरंग चुडीवाल, गोपालदास अग्रवाल, श्रीराम गोयनका ,बनवारीलाल बजाज, पुरुषोत्तम पसारी,सत्यनारायण अग्रवाल, शाम चंगोईवाला, कमल गुप्तां,सज्जन अग्रवाल, राममनोहर लोहिया, विनोद अग्रवाल, फुलचंद पटवारी, मनीष बाचुका, मनीष अग्रवाल, प्रमोद झुनझुनवाला, मिनेश केडिया, लक्ष्मीकांत पाडिया, आशिष गोयंका, बजरंग अग्रवाल, सोहंन अग्रवाल, राजू कारीवाल, राजेश खिरवाल, राहुल झुनझुनवाला, सुशील अग्रवाल, रितेश गोयल, गणेश अग्रवाल,अतुल पाडिया, अनिल पाडिया, सुशील झुनझुनवाला, गौरव सोनालवाला ,विश्वनाथ सुरेका, कमलेश अग्रवाल, विक्रम केडिया, संजय अग्रवाल, रोहित गुप्ता, रोशन अग्रवाल, दर्पण अग्रवाल,शिवम सिंघानिया समवेत महिला मंडळाने केले.

 

Web Title: Inspiring response of devotees to Queen Satti Bhadwa festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.