अकोला जिल्ह्याच्या  सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 02:31 PM2018-01-27T14:31:22+5:302018-01-27T14:36:15+5:30

अकोला: अकोला जिल्हा शैक्षणिक, सांस्कृतिक,औदयोगिक व सामाजिक क्षेत्रात भरीव प्रगती करीत असून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी दिली.

Government consolidated for the overall development of Akola District - Guardian Minister Dr. Ranjit Patil | अकोला जिल्ह्याच्या  सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

अकोला जिल्ह्याच्या  सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

googlenewsNext
ठळक मुद्दे शहरातील शास्त्री स्टेडियम येथे जिल्हा मुख्यालयाचे ध्वजारोहण पालकमंत्री यांच्या हस्ते झाले. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी, शारीरिक शिक्षण शिक्षक, आर.एस.पी. शिक्षक, पोलीस यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.यानंतर विविध शाळांच्या विदयार्थ्यांनी कवायती सादर केल्या. संकल्प प्रतिष्ठान ढोल-ताशाचे सादरीकरण केले.

अकोला: अकोला जिल्हा शैक्षणिक, सांस्कृतिक,औदयोगिक व सामाजिक क्षेत्रात भरीव प्रगती करीत असून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी दिली. शहरातील शास्त्री स्टेडियम येथे जिल्हा मुख्यालयाचे ध्वजारोहण पालकमंत्री यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर विजय अग्रवाल, आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे आदींसह स्वातंत्र्य संग्राम सैनिक, माजी सैनिक, सर्व विभागांचे अधिकारी, पत्रकार, शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, विदयार्थी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले की, जिल्‍हयातील जलसाठयांचे स्त्रोत बळकट करण्यासाठी तसेच पाणी टंचाई पासून मुक्तीकरीता महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान जिल्हयात अत्यंत प्रभावीपणे राबविले जात आहे. मागील दोन वर्षांत झालेल्या कामांमुळे 51,268 हेक्‍टर जमिन एकपाळी सिंचनाखाली व 26,815 हेक्‍टर जमिन पूर्ण सिंचनाखाली आली आहे. चालू वर्षात जलयुक्त शिवार अभियानासाठी 144 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये देखील कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच धडक सिंचन विहीरी योजनेअंतर्गत एकुण 5434 विहिरींपैकी 4612 विहिरींचे काम पूर्ण होत आलेले असून उर्वरीत विहिरी पूर्ण करण्‍याची कार्यवाही सुरु आहे. जिल्‍हयात एकुण 5 हजार शेततळे करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा अवश्य लाभ घेऊन शेतीसाठी शाश्वत सिंचनाची सोय करावी. जिल्हयातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या केळी उत्पादनाकरीता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्‍यांना शासनाच्‍या गटशेती योजनेचा लाभ पण दिला जाणार आहे. प्रगतीकडे वाटचाल करत असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित असणेही महत्वाचे आहे. शांतता व सलोख्याचे वातावरण राहावे, यासाठी प्रत्येक नागरिकाचे सहकार्य असणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासनाच्या दक्षतेमुळे जिल्हयात गुन्हेगारीला आळा बसला आहे, असे त्यांनी सांगितले.

या प्रजासत्ताक दिनात पोलीस दल, राज्य पोलीस प्रशिक्षण विभाग, गृहरक्षक दल पुरुष व महिला यांचे पथक,एन.सी.सी. पथक,वाहतूक शाखा पोलीस दल यांचे पथक,भारत स्काऊट आणि गाईड यांचे पथक,बॅन्ड पथक,श्वान पथक,दंगल नियंञण पथक,अग्नीशमन दल पथक,अंबुलन्स यासह, सर्व शिक्षाअभियान स्वच्छ भारत अभियान, आरोग्य विभागाचे जनजागृती चिञरथ यांनी संचलन केले. विविध शाळांनी केलेल्या उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थितांची प्रशंसा मिळविली. महाराष्ट्र कन्या शाळेने विविध राज्यांच्या लोकनृत्याचे प्रभावीपणे केलेले सादरीकरण सर्वांसाठी आकर्षण ठरले. त्यानंतर पालकमंत्री यांनी उपस्थित स्वातंञ्यसंग्राम सैनिकांची आस्थेवाईकपणे चौकशी करुन त्यांच्या अडीअडचणी ऐकूण घेतल्या. त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवर व पञकारांना प्रत्यक्ष भेटून त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्र संचालन जिल्हा गुणवत्ता कक्षाचे समन्वयक प्रकाश अंधारे यांनी केले.

यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट कार्याबददल जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, खेळाडू, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी, शारीरिक शिक्षण शिक्षक, आर.एस.पी. शिक्षक, पोलीस यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच पोलीस महासंचालक महाराष्ट्र शासनाचे विशेष सेवा पदक प्राप्त पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या विशेष कामगिरीबाबत पोलीसांचा सत्कार करण्यात आला. यानंतर विविध शाळांच्या विदयार्थ्यांनी कवायती सादर केल्या. संकल्प प्रतिष्ठान ढोल-ताशाचे सादरीकरण केले.

Web Title: Government consolidated for the overall development of Akola District - Guardian Minister Dr. Ranjit Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.