मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक शर्मा यांनी केले अकोला रेल्वे स्टेशनचे निरीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:52 PM2018-12-29T12:52:58+5:302018-12-29T12:53:21+5:30

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक शर्मा बडनेरा, मूर्तिजापूर, बोरगाव मंजू रेल्वे स्टेशनचे निरीक्षण केल्यानंतर वाहने अकोल्यात आले. दुपारी त्यांनी रेल्वे स्टेशनचे निरीक्षण केले आणि सीसी कॅमेरा कक्ष, सुरक्षा विभाग राजभाषा प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

 General Manager of Central Railway, Sharma conducted the inspection of Akola Railway Station | मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक शर्मा यांनी केले अकोला रेल्वे स्टेशनचे निरीक्षण

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक शर्मा यांनी केले अकोला रेल्वे स्टेशनचे निरीक्षण

Next


अकोला: मध्य रेल्वे प्रशासनातर्फे स्टेशनवरील सेवा, सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात येत आहे. प्रवाशांना दर्जेदार सेवा व सुविधा उपलब्ध करण्यासाठी नेहमीच प्राधान्य राहील; परंतु त्यासाठी जनतेचे सहकार्य गरजेचे आहे, असे मत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांनी येथे केले.
अकोला रेल्वे स्टेशनचे निरीक्षण केल्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. मध्य रेल्वे प्रशासनाने यात्रेकरूंची सुरक्षा, सेवा आणि सुविधा दर्जेदार करण्यावर भर दिला आहे. अकोला रेल्वे स्टेशनवरसुद्धा प्रवाशांना अनेक सेवा, सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. असे सांगत, डी.के. शर्मा यांनी, उत्तर भारताकडे जाण्यासाठी अकोल्यातून थेट नवीन रेल्वेगाडी सुरू करण्याचा विचार होईल; परंतु अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस आठवड्यातून दोन दिवस अकोला ते खंडवा मार्गे सुरू करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रवाशांना त्यांच्याकडील बॅग, इतर साहित्य वाहून नेण्याच्या दृष्टिकोनातून ट्रॉली उपलब्ध करून देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक शर्मा बडनेरा, मूर्तिजापूर, बोरगाव मंजू रेल्वे स्टेशनचे निरीक्षण केल्यानंतर वाहने अकोल्यात आले. दुपारी त्यांनी रेल्वे स्टेशनचे निरीक्षण केले आणि सीसी कॅमेरा कक्ष, सुरक्षा विभाग राजभाषा प्रदर्शनाचे उद्घाटन केले. रेल्वे अधिकाऱ्यांना काही सूचनासुद्धा त्यांनी केल्या. त्यानंतर विशेष निरीक्षण रेल्वेगाडीने ते शेगावकडे रवाना झाले.


तुटलेली व उखडलेली फरशी संतापले महाव्यवस्थापक!
महाव्यवस्थापक डी.के. शर्मा रेल्वे स्टेशनवर आल्यावर, त्यांचे स्टेशन व्यवस्थापक ब्रजेशकुमार यांनी स्वागत केले. त्यानंतर शर्मा हे डीआरएम आर. के. यादव यांच्यासोबत जात असताना, त्यांना प्लॅटफार्म क्रमांक एक वरील टुटलेली व उखडलेली फरशी आणि ओबड-धोबड पेव्हर्स पाहून, महाव्यवस्थापक शर्मा यांनी संताप व्यक्त करीत अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले.

स्टेशन व्यवस्थापकांना दहा हजारांचा पुरस्कार
महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांनी रेल्वे स्टेशनचे निरीक्षण केल्यानंतर स्टेशनचे व्यवस्थापक ब्रजेशकुमार यांना उत्कृष्ट कार्याबद्दल १0 हजार रुपयांचा रोख पुरस्कार देऊन त्यांनी सन्मानित केले. यावेळी स्टेशनचे उपअधीक्षक पी.एस. भट्ट, कुलकर्णी, अब्दुल मुश्ताक आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

Web Title:  General Manager of Central Railway, Sharma conducted the inspection of Akola Railway Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.