पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पतीस पाच वर्षांचा कारावास

By admin | Published: February 28, 2015 02:07 AM2015-02-28T02:07:08+5:302015-02-28T02:07:08+5:30

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा.

Five-year imprisonment for wife's suicide | पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पतीस पाच वर्षांचा कारावास

पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पतीस पाच वर्षांचा कारावास

Next

अकोला: पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शुक्रवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. देशपांडे यांच्या न्यायालयाने पतीस पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
खामगाव तालुक्यातील घारोड येथील मोतीलाल इंगोले यांची मुलगी शारदा हिचा विवाह २00६ मध्ये सस्ती येथील विशाल अंभोरे याच्यासोबत झाला होता. त्यांना तीन मुले आहेत. लग्न झाल्यानंतर पती विशाल अंभोरे, सासू इंदूबाई अंभोरे, चुलत सासरा मोतीराम अंभोरे, अजाबराव अंभोरे हे माहेराहून पैसे ंआणण्यासाठी शारदाचा शारीरिक व मानसिक छळ करीत होते. १३ जानेवारी २0११ रोजी शारदा ही घरातून अचानक बेपत्ता झाली आणि तिने घराजवळील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. विहिरीजवळ विषारी औषधसुद्धा मिळून आले. मोतीलाल इंगोले यांच्या तक्रारीनुसार चान्नी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ४९८ (अ), ३0६, ३0४ (ब) नुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. देशपांडे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने आठ साक्षीदार तपासले. शारदाच्या आई-वडिलांची साक्ष व इतर पुराव्यांच्या आधारे आरोपी विशाल अंभोरेला भादंवि कलम ४९८ (अ) मध्ये २ वर्ष कारावास, २ हजार रुपये दंड आणि कलम ३0६ नुसार पाच वर्षांचा कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. इतर आरोपींची मात्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सरकारतर्फे साहाय्यक सरकारी अभियोक्ता प्रवीण चिंचोले यांनी तर आरोपीतर्फे अँड. प्रवीण तायडे यांनी बाजू मांडली.

Web Title: Five-year imprisonment for wife's suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.