अकोल्यात काम करण्याचा पहिला दिवस समाधान अन् आनंदात गेला! - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 01:34 PM2019-02-23T13:34:11+5:302019-02-23T13:34:19+5:30

अकोला: जिल्हाधिकारी म्हणून अकोल्यात काम करण्याचा पहिला दिवस (शुक्रवार) खूप समाधान आणि प्रचंड आनंदात गेला, असे मनोगत नवे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

The first day to work in Akola went to the satisfaction and joy! - Collector | अकोल्यात काम करण्याचा पहिला दिवस समाधान अन् आनंदात गेला! - जिल्हाधिकारी

अकोल्यात काम करण्याचा पहिला दिवस समाधान अन् आनंदात गेला! - जिल्हाधिकारी

Next

अकोला: जिल्हाधिकारी म्हणून अकोल्यात काम करण्याचा पहिला दिवस (शुक्रवार) खूप समाधान आणि प्रचंड आनंदात गेला, असे मनोगत नवे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी सायंकाळी सूत्रे स्वीकारली. नवे जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याचा शुक्रवारी त्यांचा पहिला दिवस होता. दिवसभरात केलेले काम आणि त्यातून आलेला अनुभव त्यांनी सांगितला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर संबंधित अधिकाºयांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन जिल्ह्यातील निवडणूकविषयक कामाचा आढावा घेतला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत जिल्ह्यातील अंमलबजावणीच्या कामाची माहिती घेतली. ग्रामस्तरीय महिला-बालकल्याण समिती सदस्यांच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील विविध विभाग प्रमुख अधिकाºयांची तोंड ओळख आणि परिचय करून घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त भेटीसाठी आलेल्या नागरिकांसोबत चर्चा केली. जिल्हाधिकारी म्हणून अकोल्यात काम करण्याचा पहिला दिवस खूप समाधान आणि प्रचंड आनंदाचा गेला, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.

 

Web Title: The first day to work in Akola went to the satisfaction and joy! - Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.