ठळक मुद्देशेतकरी प्रमोद तायडे यांच्या कुटुंबियांना १५ हजाराचा धनादेश प्रदानकर्जबाजारीपणाला कंटाळून केली होती आत्महत्या 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गेल्या महिन्यात अकोला तालुक्यातील कौलखेड  जहागीर येथे झालेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला नाम  फाउंडेशनच्यावतीने आर्थिक मदत देण्यात आली. नटसम्राट  नाना पाटेकर व आदर्श अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सुरू  केलेली ‘नाम फाउंडेशन’ ही सामाजिक संस्था संपूर्ण  महाराष्ट्रभर शेतकर्‍यांसाठी काम करीत आहे.
  जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील कौलखेड जहागीर येथील  अल्पभूधारक शेतकरी प्रमोद पुंडलिक तायडे (३६) वर्षे या शे तकर्‍याने शेतीच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली  होती. त्यांच्या विधवा पत्नीला  सानुग्रह मदत म्हणून नाम  फाउंडेशनच्यावतीने बुधवारी पंधरा हजार रुपयांचा धनादेश  ‘नाम फाउंडेशन’चे विदर्भ व खान्देशचे समन्वयक मा. हरीश इ थापे यांच्या मार्गदर्शनात देण्यात आला. यावेळी नाम फाउंडेशनचे  जिल्हा समन्वयक माणिक शेळके, मंगेश भारसाकळे,  सामाजिक कार्यकर्ते दिलीप सावरकर गावचे सरपंच अनिल  तायडे व उपसरपंच विनायक तायडे आदी मान्यवर उपस्थित हो ते.
 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.