अकोली येथील शेतकर्‍याची आत्महत्या

By admin | Published: August 18, 2014 01:35 AM2014-08-18T01:35:22+5:302014-08-18T01:44:48+5:30

आकोट तालुक्यातील अकोली जहॉ. येथील शेतकर्‍याची आत्महत्या.

Farmer's suicide in Akoli | अकोली येथील शेतकर्‍याची आत्महत्या

अकोली येथील शेतकर्‍याची आत्महत्या

Next

अकोली जहॉ. : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आकोट तालुक्यातील अकोली जहॉ. येथील शेतकरी नामदेव चंद्रभान घोडीले (वय ३८) यांनी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना १७ ऑगस्ट रोजी घडली.
घोडीले यांच्याजवळ चार एकर शेती आहे. गतवर्षी सुध्दा शेतात नापिकी झाली. तसेच यावर्षी पावसाने दडी मारल्याने तसेच शेत शिवारातील विघृत रोहीत्र बंद असल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले होते. शिवाय घोडीले यांच्यावर भारतीय स्टेट बॅकेचे कर्ज व इतर कर्ज असल्याने चिंताग्रस्त होते. त्यामुळे आर्थिक संकटामुळे त्रस्त होवुन शेतकरी नामदेव घोडीले यांनी आपली जिवनयात्रा संपविली. ग्रामिण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर घोडीले यांचे ते भाऊ होते.त्यांच्या मागे पत्नी,तीन मुली व एक मुलगा असा आप्तपरिवार आहे. या प्रकरणी आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये र्मग दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Farmer's suicide in Akoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.