कर्जमाफीच्या अंमलबजावणीचे अपयश; शेतकरी आत्महत्या वाढत्याच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 01:06 PM2019-01-05T13:06:46+5:302019-01-05T13:06:53+5:30

अकोला : कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये आशावाद निर्माण होईल, ही अपेक्षा प्रशासकीय यंत्रणांच्या दप्तरदिरंगाईमुळे फोल ठरली आहे. तब्बल दीड वर्षापासून ...

  Failure of loan waiver; Farmer Suicide Increases! | कर्जमाफीच्या अंमलबजावणीचे अपयश; शेतकरी आत्महत्या वाढत्याच!

कर्जमाफीच्या अंमलबजावणीचे अपयश; शेतकरी आत्महत्या वाढत्याच!

Next


अकोला: कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये आशावाद निर्माण होईल, ही अपेक्षा प्रशासकीय यंत्रणांच्या दप्तरदिरंगाईमुळे फोल ठरली आहे. तब्बल दीड वर्षापासून शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी कासवगतीनेच सुरू असल्यामुळे शेतकºयांमधील नैराश्य वाढतेच असल्याचे शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
अकोला जिल्ह्याची आकडेवारी तपासली असता जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षभराच्या कालावधीत तब्बल ११८ शेतकऱ्यांनी गळफास आवळला आहे. नापिकी, कर्जबाजरीपणा व शेतमालाचा कमी भाव प्रामुख्याने या तीन कारणांमुळेच आत्महत्या झाल्याचे सरकारी दप्तरात नोंदविलेले आहे. नापिकीला लहरी निसर्ग, शेतमालाच्या कमी भावाला सरकारी धोरण कारणीभूत आहे, तसेच कर्जबाजारीपणातून मुक्त होण्यासाठी दिलेल्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीची संथ गती आत्महत्यांसाठी जबाबदार ठरली आहे.
अपुऱ्या व लहरी पावसामुळे दुष्काळ आणि नापिकीला सामोरे जावे लागलेल्या शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागले. भाजपा सरकारने कर्जबाजारी झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गत २८ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करण्यात आली; मात्र या योजनेची तत्काळ अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात प्रशासकीय यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्यामुळे सरकार विरोधात रोष निर्माण झाला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत्याच आहेत. विशेष म्हणजे, गत वर्षभरात झालेल्या ११८ आत्महत्यांमध्ये ६६ शेतकरी आत्महत्या या मदतीस पात्र ठरविण्यात आल्या असून, ३१ आत्महत्या अपात्र ठरविल्या आहेत. तब्बल २१ आत्महत्यांच्या बाबतीत जिल्हा प्रशासनाने कुठलाही निर्णय घेतलेला नाही. या आत्महत्यांची वाढती संख्या व कर्जमाफ ीच्या अंमलबजावणीची स्थिती यांचे प्रमाण पाहिले असता अंमलबजावणीमधील अपयश अधोरेखित होते. जिल्ह्यात कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज केलेल्या शेतकºयांपैकी ३१ डिसेंबरपर्यंत १ लाख २९ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असला तरी, नऊ हजार शेतकरी अद्याप कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.


शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची योजना आणली. सारे सोपस्कार पार पाडून योजना तयार झाली, घोषित झाली; मात्र अंमलबजावणी करणाºया यंत्रणेमुळे ही योजना सपशेल अपयशी ठरल्याने शेतकºयांमधील नैराश्य कायम असून, त्याचाच परिणाम आत्महत्यामध्ये वाढ होण्यात झाली आहे.
-किशोर तिवारी,
अध्यक्ष, कै .वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन.

 

Web Title:   Failure of loan waiver; Farmer Suicide Increases!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.