पीक विम्याच्या लाभातून कुरणखेड महसूल मंडळाला वगळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 03:39 PM2019-06-25T15:39:16+5:302019-06-25T15:39:49+5:30

अकोला: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत सर्वच महसूल मंडळातील पिकांचे नुकसान झाले असताना, अकोला तालुक्यातील कुरणखेड महसूल मंडळाला पीक विम्याच्या लाभातून वगळण्यात आले.

exclude from the benefit of crop insurance | पीक विम्याच्या लाभातून कुरणखेड महसूल मंडळाला वगळले!

पीक विम्याच्या लाभातून कुरणखेड महसूल मंडळाला वगळले!

Next

अकोला: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत सर्वच महसूल मंडळातील पिकांचे नुकसान झाले असताना, अकोला तालुक्यातील कुरणखेड महसूल मंडळाला पीक विम्याच्या लाभातून वगळण्यात आले. त्यामुळे यासंदर्भात संबंधित अधिकाºयावर कारवाई करून, पीक विम्याच्या लाभासाठी या महसूल मंडळाला समाविष्ट करण्याची मागणी कुरखेड महसूल मंडळातील ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.
गतवर्षीच्या खरीप हंगामात कुरणखेड महसूल मंडळांतर्गत गावांमधील शेतकºयांनी मूग, उडीद, तूर, ज्वारी, सोयाबीन व कपाशी इत्यादी पिकांचा विमा काढला आहे; परंतु जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ असल्याने आणि सर्वच महसूल मंडळातील शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले असताना अकोला तालुक्यातील कुरणखेड महसूल मंडळाला पीक विम्याच्या लाभासाठी वगळण्यात आले. दुष्काळी परिस्थितीत या महसूल मंडळातील शेतकºयांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याची वस्तुस्थिती असताना पीक विम्याच्या लाभासाठी कुरणखेड महसूल मंडळातील शेतकºयांना वगळण्यात आले. त्यामुळे यासंदर्भात संबंधित विमा कंपनीला जाब विचारून संबंधित अधिकाºयावर कारवाई करण्यात यावी आणि पीक विम्याच्या लाभासाठी कुरणखेड महसूल मंडळाला समाविष्ट करण्याची मागणी या महसूल मंडळातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागणीचे निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा अवचार, अ‍ॅड. संतोष राहाटे, अरुंधती शिरसाट, कोठारी येथील सरपंच महेंद्र इंगळे, दुधलमचे सरपंच रवींद्र पंडित, देवळीचे विकास सदांशिव, पातूर नंदापूरचे माजी उपसरंपच पंकज मुळे, सुकळी नंदापूरचे माजी सरपंच विठ्ठल सारसे, कानशिवणीचे माजी सरपंच रावसाहेब अवचार, प्रवीण वाहुरवाघ, देवळीचे देवानंद सदांशिव, बोरगाव खुर्दचे सतीश चोपडे, दिनेश मुळे, सुखदेवराव दामोदर, सचिन लाखे, गजानन काकड, संदीप गावंडे, उल्हास सदांशिव, धनराज पंडित यांच्यासह कुरणखेड महसूल मंडळांतर्गत गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

अन्यथा २७ जूनपासून आंदोलनाचा इशारा!
पीक विम्याच्या लाभासाठी कुरणखेड महसूल मंडळाला समाविष्ट करण्यात यावे, अन्यथा २७ जूनपासून या महसूल मंडळांतील शेतकरी पीक विम्याचा लाभ मिळेपर्यंत आंदोलन करणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी दिला आहे.

 

 

Web Title: exclude from the benefit of crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.