पैनगंगा नदीवरील बॅरेजेस परिसरात वीज सुविधांची कामे संथगतीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 02:28 PM2019-03-26T14:28:26+5:302019-03-26T14:28:39+5:30

वाशिम : ७१६.४२ कोटी रुपयांचा निधी खर्च करून जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी बॅरेजेस उभारण्याचे काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण आले.

Electricity facilities in the area of Panganga river goes slow! | पैनगंगा नदीवरील बॅरेजेस परिसरात वीज सुविधांची कामे संथगतीने!

पैनगंगा नदीवरील बॅरेजेस परिसरात वीज सुविधांची कामे संथगतीने!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ७१६.४२ कोटी रुपयांचा निधी खर्च करून जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी बॅरेजेस उभारण्याचे काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण आले. या बॅरेजेस परिसरात आता मंजूर असलेल्या ९५ कोटींच्या निधीतून विजेच्या सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, त्याची गती अगदीच संथ असून चार उपकेंद्रांसाठी ३२ किलोमिटर दुर असलेल्या हिंगोलीवरून ‘पॉवर’ घेणे अडचणीचे ठरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सिंचनाची प्रभावी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या वरूड, जुमडा, कोकलगाव, अडगाव, गणेशपूर, राजगाव, उकळीपेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर अशा ११ ठिकाणी ७१६.४२ कोटी रुपयांचा निधी खर्च करून बॅरेजेस उभारण्यात आले. हे काम दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झाले. मात्र, सिंचनाकरिता पाणी घेण्यासाठी लागणारी विजेची सुविधा अद्यापपर्यंत उभी झालेली नाही. मध्यंतरी शासनाने ९५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वीज सुविधांच्या कामांना परवानगी दिली. त्यानुसार, सद्या बॅरेजेस परिसरात साधारणत: १२ नवीन उपकेंद्र, ३३ केव्हीची १६५ किलोमिटर उच्च दाब वाहिनी, ११ केव्हीची ३१० किलोमिटर उच्चदाब वाहिनी टाकणे तथा १९०० नवीन रोहित्र उभारण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, या कामांची गती अगदीच कमी असून ५० ते ६० रोहित्र बसविण्याची कामेच पूर्ण होवू शकली आहेत. 
विशेष गंभीर बाब म्हणजे वाशिममध्ये कुठेच ‘पॉवर’ शिल्लक नसल्याने बॅरेजेस परिसरातील महत्वपूर्ण ठरणाºया कोकलगाव, अटकळी, गणेशपूर आणि उकळीपेन या चार उपकेंद्रांसाठी ३२ किलोमिटर दुर असलेल्या हिंगोलीवरून ‘पॉवर’ आणली जाणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यूत लाईन टाकावी लागणार असून ही बाब तुलनेने अडचणीची ठरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Electricity facilities in the area of Panganga river goes slow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम