शाळांना दिवाळीच्या सुट्या देण्यात शिक्षण विभागाचा भेदभाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 03:23 PM2018-11-16T15:23:45+5:302018-11-16T15:23:54+5:30

अकोला: जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांना दिवाळीच्या सुट्या देताना माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी भेदभाव केल्याचा आरोप शिक्षक आघाडी व शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी केला आहे.

Education Department's discrimination on Diwali holidays to schools! | शाळांना दिवाळीच्या सुट्या देण्यात शिक्षण विभागाचा भेदभाव!

शाळांना दिवाळीच्या सुट्या देण्यात शिक्षण विभागाचा भेदभाव!

Next

अकोला: जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांना दिवाळीच्या सुट्या देताना माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी भेदभाव केल्याचा आरोप शिक्षक आघाडी व शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी केला आहे. अमरावती विभागातील शाळांना दिवाळीच्या सुट्या एकसमान असाव्यात, अमरावती जिल्ह्यातील शाळांना २0 नोव्हेंबरपर्यंत सुट्या दिलेल्या असताना, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी अकोला जिल्ह्यातील शाळांना मात्र १६ नोव्हेंबरपर्यंत सुट्या दिल्या आहेत. त्यामुळे आमदार देशपांडे यांनी शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांनी निवेदन पाठविले आहे.
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये दिवाळीच्या शाळांना सुट्या घोषित करण्यात आल्या आहेत. सर्व जिल्ह्यांमध्ये दिवाळीच्या सुट्या एकसमान असायला हव्यात. अमरावतीच्या शिक्षणाधिकाºयांनी २0 नोव्हेंबरपर्यंत शाळांना सुट्या दिल्या आहेत; परंतु अकोला शिक्षणाधिकाºयांनी त्यांच्या जिल्ह्यातील शाळांना केवळ १६ नोव्हेंबरपर्यंत सुट्या देऊन भेदभाव केल्याचा आरोपही शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी केला आहे. अकोला जिल्ह्यातील शाळांना सुट्या देताना शिक्षणाधिकारी मुकुंद यांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला. शिक्षण उपसंचालक पेंदोर यांनी शिक्षणाधिकाºयांना निर्देश देऊन अकोला जिल्ह्यातील शाळांना २0 नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्या द्याव्यात आणि शैक्षणिक सत्र १ मे ऐवजी ५ मे रोजी संपवावे, अशी मागणीही आमदार देशपांडे यांनी शिक्षण उपसंचालकांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.(प्रतिनिधी)

शिक्षण समन्वय समितीचीनेही केली होती मागणी!
अमरावती विभागातील इतर जिल्ह्यांप्रमाणे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची दिवाळीची सुटी २0 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याची मागणी शिक्षण समन्वय समितीच्यावतीने शिक्षणाधिकाºयांना ३0 आॅक्टोबर रोजी दिलेल्या निवेदनात केली होती; परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शिक्षण समन्वय समितीने केला आहे.
 

सर्व शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाºयांना विश्वासात घेऊनच शाळांच्या दिवाळी सुट्यांचे नियोजन केले होते. शिक्षण उपसंचालकांनी निर्देश दिले, तर शाळांच्या सुट्या २0 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याचा विचार करता येईल.
प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी
माध्यमिक जि.प.

 

Web Title: Education Department's discrimination on Diwali holidays to schools!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.